• Mon. Nov 25th, 2024
    पोलिसांना ४८ तासांसाठी मोकळा हात द्या; घोसाळकर प्रकरणावरुन राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर

    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यात टीकांचे बाण सुरु आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन अध्यक्ष राज ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “माझा मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे. त्यांच्या हातात ४८ तास द्या, महाराष्ट्रातून गुन्हेगारी नाहीशी होईल” असं राज ठाकरे म्हणाले होते.

    “राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या… #बेधडक #राजदंड” असं कॅप्शन देत मनसे अधिकृत या एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला दिलं आहे.

    अजितदादा म्हणाले, घोसाळकर प्रकरणी विरोधक फायदा घेतायत; संजय राऊत म्हणतात, तुमचे चिरंजीव ज्या माफियाला भेटले…

    व्हिडिओमध्ये काय आहे?

    व्हिडिओत राज ठाकरे म्हणाले होते, की “आपल्या देशात कायदे आहेत… म्हणजे लॉ आहे, पण ऑर्डर नाहीये. मला असं वाटतं ऑर्डरची गरज आहे, सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात, माझा मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे. त्यांच्या हातात ४८ तास द्या आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करुन द्या”

    भाई क्यू जाना है? कार्यकर्त्याने अडवलं, तरी अभिषेक घोसाळकर गेले, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरार
    “सगळ्या गोष्टी पोलिसांना माहिती असतात, पण ऑर्डर नसतात, त्यामुळे रिस्क कोण घेईल? आणि पोलिसांना एखादी भूमिका घेतल्यावर जेलमध्ये जावं लागत असेल, तर ते का जातील? आणि कोणासाठी जातील? तिथे बसलेला माणूसच टेम्पररी आहे. त्याच्यासाठी यांनी पर्मनन्ट जेलमध्ये जायचं, याला काय अर्थ आहे का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता.

    घटना अत्यंत दुर्दैवी पण विरोधक सरकारची उगाच बदनामी करतायत; अजित पवारांची सारवासारव

    “आपल्याकडे उत्तम काम करणारे पोलीस अधिकारी आहेत. महाराष्ट्र भाग्यवान आहे त्याबाबत. त्यांना फक्त तुम्ही ४८ तासांसाठी मोकळा हात द्या” असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर ‘महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखायची असेल, तर ४८ तासांसाठी महाराष्ट्र पोलिसांना मोकळीक द्या, महाराष्ट्रातून गुन्हेगारी नाहीशी होईल’ असं अखेर लिहून आलं.

    पाहा व्हिडिओ

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed