• Tue. Nov 26th, 2024

    सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून बाबर कुटुंबियांचे सांत्वन

    ByMH LIVE NEWS

    Feb 8, 2024
    सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून बाबर कुटुंबियांचे सांत्वन

    सांगली, दि. , (जिमाका) : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन धीर दिला.

    खानापूर – आटपाडी मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे दि. ३१ जानेवारी रोजी निधन झाले. खानापूर तालुक्यातील गार्डी येथे आज मंत्री श्री. चव्हाण यांनी भेट घेऊन दिवंगत आमदार बाबर यांचे चिरंजीव अमोल आणि सुहास बाबर यांच्यासह बाबर कुटुंबियांचे सांत्वन केले व आस्थेने विचारपूस करून धीर दिला.

    तत्पूर्वी त्यांनी दिवंगत आमदार बाबर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी मंत्री श्रीा. चव्हाण यांनी अनिल बाबर यांच्या विधी मंडळातील आठवणी कथन केल्या. बाबर कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून, त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे बंधु दिलीप व शरद बाबर, सत्यजित देशमुख, धैर्यशील कदम, हेमंत बाबर, सम्राट महाडीक, संभाजी जाधव, विजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed