काय म्हणतो अहवाल?
– भारतातील तेलाची मागणी २०२३मध्ये रोज ५४.८ लाख बॅरल आहे
– ती सन २०२३पर्यंत ६६.४ लाख बॅरलपर्यंत वाढेल
– सन २०२७मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वांत मोठा तेल आयातदार देश होईल
– मात्र, २०२३मध्येही भारतातील तेलाची एकूण मागणी चीनपेक्षा कमी असेल
– एकूण मागणीपैकी ८५ टक्के तेल भारत आयात करतो.
डिझेलची सर्वाधिक आयात
– २०३०मध्ये भारताच्या एकूण तेल आयातीपैकी डिझेलचा वाटा सर्वाधिक म्हणजे ५० टक्के राहील
– भारतातील डिझेलची एकूण मागणी जागतिक मागणीच्या २० टक्के असेल
– जेट केरोसिनच्या मागणीतील वाढ वार्षिक ५.९ टक्के राहील
– पेट्रोलच्या मागणीतील वाढ फक्त ०.७ टक्के राहील
देशांतर्गत उत्पादन कमीच
– भारतात खनिज तेलाचे उत्पादन अत्यंत कमी
– देशातील एकूण मागणीच्या १३ टक्के उत्पादन
– सन २०२३मध्ये देशांतर्गत उत्पादन रोज सात लाख बॅरल
– नव्या क्षेत्रांतून उत्खनन होत नसल्याने २०३०मध्ये देशांतर्गत उत्पादनात घट अपेक्षित
– सन २०३०मध्ये देशांतर्गत उत्पादन रोज ५.४० लाख बॅरल होणार
कसा असतो देशातील तेलाचा साठा?
– देशात ६६ दिवस पुरेल इतका तेलाचा साठा असतो
– यातील सात दिवस पुरेल इतका साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी भूमिगत स्वरूपात साठवला जातो
– उर्वरित साठा डेपो आणि टाक्यांमध्ये साठवला जातो
– ‘आयईए’कडे ९० दिवसांचा साठा राखीव असतो
– भारत या संघटनेचा सहयोगी सदस्य आहे
दृष्टिक्षेपात तेल आयात (बॅरल पर डे)
– चीन – १.१३ कोटी
– भारत – ५४.८ लाख
– अमेरिका – २९.३ लाख