• Sat. Sep 21st, 2024
पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांना अटक, काय घडलं?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासण्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना सदर पोलिसांनी अटक केली आहे. राऊत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शनिवारी जिल्हा परिषद परिसरात आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतील फलकांवर ‘मोदी सरकारची हमी’ऐवजी ‘भारत सरकारची हमी’ असा बदल काही केला होता. याचवेळी त्यांनी मोदींच्या छायाचित्राला काळे फासले, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी हे आंदोलन केले होते. केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची नागरिकांना माहिती व्हावी, हा उद्देश असायला हवा. मात्र, या फलकांवर योजना कोणासाठी, निकष काय, लाभासाठी कोणाकडे संपर्क साधावा, याची कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. जनजागृतीचा उद्देशच यामुळे पूर्ण होत नाही, केवळ प्रचारासाठी याचा वापर होत आहे, असा आरोप राऊत यांनी केला. योजनेच्या जाहिरातीत व्यक्तीविशेषाचाच अधिक उल्लेख करण्यात आला आहे. सर्व योजनांमध्ये ‘भारत सरकार’, असाच उल्लेख हवा. इतर सर्व ठिकाणची फलके हटविण्यात यावीत, अशी मागणीही शनिवारी आंदोलनादरम्यान केली होती.

इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरींना गुजरात एटीएसकडून अटक, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कारवाई
यावरून पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम ४१ अंतर्गत राऊत यांना नोटीस बजावली. त्यांनी चौकशीसाठी आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले होते. रविवारी कुणाल हे कुही परिसरातील जनसंवाद यात्रेत होते. पोलिसांनी त्यांना कुही येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे कळते. पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या गुन्ह्यात अटक होऊच शकत नाही. पोलिस भाजपच्या दबाबात काम करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

आम्ही मोदींचे नागरिक की भारताचे नागरिक असं बोलणार? ग्राम विकास मंत्र्यांच्या गावात विकास रथ अडवला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed