• Sat. Sep 21st, 2024
पुरुषांचं आरोग्य खालावतंय; राज्यात ‘या’ आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात, काय सांगते आकडेवारी?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : आरोग्य विभागातर्फे राज्यात करण्यात येत असलेल्या तपासणी मोहिमेमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यात आरोग्य विभागाकडून ‘निरोगी तरुणाई, वैभव महाराष्ट्राचे’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये राज्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे सर्वाधिक पुरुष रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळले आहेत.

जीवनशैली बदलण्याचा सल्ला

कमी वयात हृदयरोग आणि अन्य आजार होण्यास उच्च रक्तदाब कारणीभूत असल्याने या आजाराला रोखण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीमध्ये बदल करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. ‘निरोगी तरुणाई, वैभव महाराष्ट्राचे’ या मोहिमेअंतर्गत राज्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ३८ लाख सात हजार ३५६ जणांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. यातील सर्वाधिक पाच लाख ७१ हजार १७९ पुणे जिल्ह्यातील आहेत.

तपासणी जवळपास पूर्ण

उच्च रक्तदाबाचे नाशिकमध्ये दोन लाख ७२ हजार ३५१, तर ठाण्यात दोन लाख २८ हजार ४१९ रुग्ण आढळले आहेत. या मोहिमेत निश्चित केलेल्या उद्दिष्टांपैकी पुण्यात ८५ टक्के रुग्णांची तपासणी पूर्ण झाली आहे. नाशिकमध्ये ८६ टक्के, तर साताऱ्यात ७६ टक्के रुग्णांची तपासणी झाली आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा तपासणीचे प्रमाण जास्त असल्याने या जिल्ह्यांमध्ये रुग्ण जास्त आढळल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

काही शस्त्रक्रियाही पूर्ण

या मोहिमेत राज्यातील १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन कोटी ७९ लाख ९९ हजार २९० पुरुषांची तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यातील दोन कोटी ६८ लाख ९७ हजार ३७४ जणांच्या आरोग्य तपासणीबरोबरच ‘ईसीजी’, ‘सिटी स्कॅन’ आणि ‘एक्स-रे’ या चाचण्या करण्यात आल्या आहेत. याचबरोबर ३४ लाख ८९ हजार २२२ जणांवर औषधोपचार करण्यात आले असून, २९ हजार ६५५ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

मधुमेहाचे चार लाख रुग्ण

राज्यात मधुमेहाचे चार लाख ६७ हजार रुग्ण आढळले असून, त्यात सर्वाधिक, ३७ हजार रुग्ण पुण्यातील आहेत. कोल्हापूरमध्ये मधुमेहाचे ३६ हजार आणि अकोल्यात २६ हजार रुग्ण आढळले आहेत. बदलती जीवनशैली आणि वाढता ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
रुग्णांनी सेवन केले बोगस अ‍ॅन्टिबायोटिक; पावणेचार लाख टॅबलेट फस्त, उत्पादक कंपनी अस्तित्वातच नाही
निदान झालेले रुग्ण
१ लाख ८६ हजार
हृदयविकार

७४
मुखाचा कर्करोग

१ हजार ६६८
ओरल सबम्युकस फायब्रोसिस

७७८
मोतिबिंदू

१ हजार २९८
रक्तक्षय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed