• Sat. Sep 21st, 2024
उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे आम्हाला कधीच फरक पडला नाही – निलेश राणे

सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये कॉर्नर सभा घेणार असून या सभेला माजी खासदार निलेश राणे यांनी विरोध केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सभा एखाद्या मैदानात किंवा हॉलमध्ये घ्यावी, असा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे. कुडाळ शहरामध्ये घेत असलेल्या सभेमुळे प्रचंड प्रमाणावर शहरात ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेमुळे आमच्यावर कोणताच परिणाम होणार नसल्याचं निलेश राणे यांनी सांगितलं आहे.
आरक्षण मिळालं, गुलाल उधाळला, तर पुन्हा उपोषण कशाला? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना सवाल
उद्या उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्गमध्ये येत आहेत. उद्धव ठाकरे हे कुडाळ शहरातून सभा करून पुढच्या दौऱ्याला निघणार आहेत. कुडाळ बाजार पेठमध्ये सभा आयोजित केली आहे. शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या कायम असताना उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. ट्राफिकची समस्या शहरांमध्ये निर्माण होत असताना उद्धव ठाकरे यांना शहरांमध्ये सहभाग घेऊन काय साध्य करायचं आहे हे मला माहिती नाही. या गर्दीचा त्रास सर्वसामान्य आणि वाहन चालकांना होणार आहे, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही एका गटाचे प्रमुख आहात. तुम्ही मोठ्या मैदानामध्ये किंवा हॉलमध्ये सभा घेतली पाहिजे, असा सल्ला माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. कुडाळ शहरांमध्ये आधीच गर्दी असते. त्यामध्ये सर्व लोकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आणि अशा ठिकाणी तुम्ही जर सभा घ्यायला गेलात तर ते सर्वसामान्य लोकांना अडचणीचा ठरणार आहे. या संदर्भात कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दिली जाणार आहे.

सरकारची सुपारी घेऊन बोलणं तुमच्यासारख्यांना शोभत नाही, मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंवर पलटवार

निलेश राणे म्हणाले की, जर कुठल्या पक्षाचा प्रमुख नेता येत असेल तर त्यांनी हॉलमध्ये किंवा मैदानामध्ये सभा घ्यावी. जिथे लोकांची गर्दी आहे तिथे घुसण्याचा प्रयत्न करू नका. मला माहिती आहे तुम्हाला लोकं जमवण्यासाठी अडचण होत आहे. आम्ही तुम्हाला मदत करू, दोन पाचशे लोक जमवण्यासाठी पण लोकांना अडचणीत टाकू नका. सभेचं ठिकाण बदला आणि योग्य त्या ठिकाणी सभा घ्या. उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे आम्हाला कधीच फरक पडला नाही. लोकांना अडचण होईल, असं काही करू नका. म्हणून मी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो, असं ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed