• Mon. Nov 25th, 2024
    शरद मोहोळला संपवलं, आता माझ्याही जीवाला धोका, पत्नी स्वाती यांचा गंभीर आरोप, दोन नावं सांगितली

    पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खुनानंतर आता स्वाती मोहोळ यांना जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप त्यांनी कोर्टाच्या पुरवणी जबाबात केला आहे. पोलिसांनी हा गोपनीय अहवाल कोर्टात सादर केला आहे. काल न्यायालयाने गणेश मारणे याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहोळ खून प्रकरणातील फरारी मुख्य आरोपी गणेश मारणे याला पोलिसांनी बुधवारी रात्री पाठलाग करून संगमनेरजवळून अटक केली. त्याला गुरुवारी विशेष मोकोका न्यायाधीश व्ही.आर.कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी गोपनीय अहवाल सादर करत गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती न्यायालयाला दिली.

    सहायक पोलीस आयुक्त आणि खुणाचे तपास अधिकारी सुनील तांबे यांनी न्यायालयाने सादर केलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर, आणि नामदेव कानगुडे यांनी आपण गणेश मारणे टोळीतले साथीदार असल्याची माहीती पोलीस कस्टडीत दिली होती. १ फेब्रुवारी रोजी मुख्य सुत्रदार गणेश मारणे याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी माहिती सादर करताना शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळसह फिर्यादी अरुण धुमाळ यांना आरोपीपासून जीवाला धोका असल्याची माहिती सादर केली आहे.

    छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानिया यांचा मोठा दावा; भुजबळ म्हणतात, मला नवीन काही…
    गणेश मारणे विठ्ठल शेलारसह १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मारणे आणि शेलार यांनी खुनाचा कट रचला होता. शरद मोहोळ याचा खून झाल्यानंतर मारणे कर्नाटकातील बेंगळुरू, तेलंगणातील हैदराबाद, ओडिशासह महाराष्ट्रातील तुळजापूर, सोलापूर, निपाणी राज्यात लपण्यासाठी फिरत होता. ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्रातल्या संगमनेर येथे तो लपला असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत मारणे याला अटक केली.

    अरविंद केजरीवाल यांनी पाचव्यांदा समन्स धुडकावलं, आम आदमी पार्टीनं कारण सांगितलं, ED काय करणार?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *