• Mon. Nov 25th, 2024

    अल्पवयीन मुली घरातून पळून गेल्या; सापडताच धक्कादायक कारण समोर, नेमकं काय घडलं?

    अल्पवयीन मुली घरातून पळून गेल्या; सापडताच धक्कादायक कारण समोर, नेमकं काय घडलं?

    लातूर: शाळेत जाऊन अभ्यास करावा लागू नये, म्हणून मुलं एक ना अनेक कारणं देतात. त्यांच्या भविष्याची चिंता करणारे पालक मात्र त्यांचं काही न ऐकता अभ्यास करायला लावतात. मग असे पालक मुलांना आपले दुश्मनच वाटतात. अशा दुष्मनाच्या घरी रहायचेच कशाला? असा राग डोक्यात घालून दोन अल्पवयीन मुली चक्क घरातून पळून गेल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. मात्र पोलिसांनी त्यांना २४ तासांच्या आत ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केलं आहे.
    GST अधिकारी बनून पोलिसांनीच मारला हात, तपासाची चक्रे फिरवताच ताब्यात; बडे मासे अडकण्याची शक्यता
    आमच्या दोन अल्पवयीन मुलींचं कोणीतरी अपहरण केलं आहे, अशी तक्रार घेऊन काळजाचे पाणी झालेले पालक औराद पोलीस ठाण्यात आले. अल्पवयीन मुली म्हटल्यास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांनी तात्काळ दखल घेत तपासाची चक्रे फिरवली. मुली आपल्याला मैत्रिणींना इंस्टाग्रामवरून फोन करत असल्याचं सामोर आलं. त्या बोलत असताना बसची घोषणा होत असल्याचं पोलिसांना ऐकायला मिळालं. त्या आधारे पोलिसांनी लातूर जिल्ह्यासह धाराशिव, नांदेड, या सीमावर्ती जिल्ह्यातील बस स्थानक अन् पोलिसांना मुलींचे फोटो पाठविले.

    १० वर्षांपूर्वी पती वारले, कोरोनामध्ये सासरे गेले; महिलेने पीठाची गिरणी चालवून उचलली कुटुंबाची जबाबदारी

    या मुलींची मिसिंग तक्रार दाखल असून तात्काळ तपास करायला सांगितला. शोधाशोध सुरू झाली अन् या मुली लातूर बस स्थानकात असल्याचे कर्तव्यावरील गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदाराला दिसून आल्या. या मुलींना महिला पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन औराद शहाजानी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी विचारपूस करून समजाऊन सांगत या मुलींना पालकांच्या स्वाधीन केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed