• Sat. Sep 21st, 2024

रेल्वे भरतीची जाहिरात आलीय, मराठी तरुण तरुणींना रोजगार मिळेल हे पाहा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

रेल्वे भरतीची जाहिरात आलीय, मराठी तरुण तरुणींना रोजगार मिळेल हे पाहा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीबाबत महत्त्वाचं आवाहन केलं आहे. रेल्वेकडून नुकतीच सहायक लोको पायलट भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची माहिती राज्यातील मराठी युवकांना करुन द्यावी तसेच त्यांना भरतीबाबत मार्गदर्शन करावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन मराठी तरुण तरुणींना रोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत असं म्हटलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहायक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे.

रेल्वेची ५६९६ जागांसाठी भरती

भारतीय रेल्वे विभागाकडून सहायक लोकोपायलट पदाच्या ५६९६ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेतून नोकरी मिळवण्यासाठी १९ फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. रेल्वेनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार विविध विभागांच्या वेबसाइटवर अर्ज दाखल करता येणार आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यातील मराठी तरुणांना या भरतीद्वारे संधी मिळावी यासाठी मनसैनिकांनी तज्ज्ञांची मदत घ्यावी, असं म्हटलं आहे. अर्ज दाखल करण्यापासून मुलाखतीपर्यंतचं सहकार्य तरुणांना करावं असं राज ठाकरे म्हणाले. राज्यातील मराठी तरुण तरुणींकडून या भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले जाण्याची शक्यता आहे.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed