• Sat. Sep 21st, 2024
कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का; तीव्रता ३.१ रिश्टर स्केल, परिसर हादरला

सातारा: कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १६ किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋत्येला ६ किलोमीटरवर होता. भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच कोठेही पडझड झाली नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन, महसूल प्रशासनाने दिली आहे.
अजितदादांचे आमदार शेखर निकम यांना शह देण्याची तयारी, शरद पवारांनी डाव टाकला, नवा पर्याय शोधला
भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो कोयनानगर परिसरातच जाणवला. पाटण तालुक्यात अन्यत्र कोठेही या भूकंपानं पडझड झालेली नाही. यंदाच्या वर्षातील भूकंपाचा हा पहिला धक्का बसला आहे. सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली ९ किलोमीटर होती. सौम्य धक्का असल्याने तो केवळ कोयनेतच जाणवला.

कायदा बनलाय, जवळपास आरक्षण मिळालंय, मराठे जिंकून आलेत : मनोज जरांगे पाटील

कोयना खोऱ्यात २०२३ मध्ये भूकंपाचे ७ धक्के बसले होते. ८ जानेवारी २०२३ रोजी २.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर १ फेब्रुवारी, दि. ६ मे, दि. १६ ऑगस्ट, दि. ७ सप्टेंबर, दि. २९ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed