• Sun. Sep 22nd, 2024

घराबाहेर चावी ठेवणं पडलं महागात, पुण्यातील उच्चभ्रू टाउनशिपमध्ये धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?

घराबाहेर चावी ठेवणं पडलं महागात, पुण्यातील उच्चभ्रू टाउनशिपमध्ये धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, हडपसर : मोलकरणीसाठी घराच्या बाहेर बास्केटमध्ये स्मार्ट कार्ड ठेवणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्याने स्मार्ट कार्ड घेऊन घरफोडी केल्याचा प्रकार हडपसर परिसरातील अमनोरा टाउनशिपमध्ये घडला असून, घरातून चार तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. हा प्रकार नऊ जानेवारी ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान घडला.

या प्रकरणी अमनोरा येथील ड्रिनोरी टॉवरमध्ये राहणाऱ्या एका ३३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पत्नीसह अमनोरा टाउनशिपमधील ड्रिनोरी टॉवर नंबर ३७मध्ये राहतात. तक्रारदाराची पत्नी अनेक दिवसांपासून गावाला गेलेली होती, तर तक्रारदार सकाळी दहा वाजता कामाला जात असत. त्यांची मोलकरीण सकाळच्या वेळेत घरी येऊन काम करून जात होती. त्यामुळे तक्रारदार घरातून निघताना दरवाजाच्या स्मार्ट लॉकचे कार्ड बाहेरील कपाटावर एका बास्केटमध्ये ठेवून जात असत. रात्री कामावरून आल्यानंतर ते बास्केटमध्ये ठेवलेले स्मार्ट कार्ड घेऊन पुन्हा घराचा दरवाजा उघडत.

लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा…! मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंचे सुचक ट्विट
२४ जानेवारीला तक्रारदार यांच्या पत्नीने घरातील सोन्याचे दागिने घेऊन त्यांना गावाला बोलवले होते. कपाटातील सोन्याचे दागिने घेण्यासाठी गेले असता, त्यांना कपाटात दागिने आढळले नाहीत. त्यामुळे चोरी झाल्याचे त्यांना कळाले. बेडरूममधील लाकडी कपाटामध्ये ठेवलेले अंगठी, कानातील फुले, कानातील रिंग असे चार तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार हडपसर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार मनोज सकट करीत आहेत.

एकाची बॅनरबाजी तर दुसऱ्याची डायलॉगबाजी, वाशिममध्ये रंगली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरची चर्चा
नागरिकांनी हे टाळावे…

– अनेक जण घराबाहेर चपलेच्या स्टँडमध्ये, दाराच्या वरील भागात किंवा अन्य ठिकाणी चावी लपवून ठेवतात.

– अशा प्रकारे लपवलेल्या चाव्या घेऊन चोरीच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत.

– दुसऱ्यासाठी चावी ठेवावे लागण्याची वेळ येते, अशा लोकांनी बनावट चावी करून घ्यावी.

खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या अन् सिलेंडर घेऊन मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed