• Mon. Nov 25th, 2024

    एकाची बॅनरबाजी तर दुसऱ्याची डायलॉगबाजी, वाशिममध्ये रंगली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरची चर्चा

    एकाची बॅनरबाजी तर दुसऱ्याची डायलॉगबाजी, वाशिममध्ये रंगली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरची चर्चा

    पंकज गाडेकर, वाशिम : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या बॅनरची चर्चा रंगू लागली आहे. आ. इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर त्यांच्या पत्नी अॅड. मोहिनी इंद्रनील नाईक यांचा मोठा फोटो झळकत असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक असल्याचे बोललं जात आहे. सध्या त्यांचे बॅनर लोकसभा मतदार संघात झळकत आहेत.

    यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सलग पाच वेळा खा. भावना गवळी ह्या या मतदार संघातून निवडून आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहरराव नाईक, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी मंत्री माणिकराव ठाकरे अश्या मातब्बर राजकारण्यांना पराभूत केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खा. भावना गवळी ह्या स्वतः सहाव्यांदा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

    भारताच्या रोहन बोपण्णाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत जेतेपदासह रचला विश्वविक्रम
    यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदार संघ बंजारा बहुल मतदार संघ आहे. या मतदार संघातील बंजारा समाजाचे मतदान हे निर्णायक मतदार आहेत. संपूर्ण देशातील बंजारा समाजाची काशी सुद्धा याच मतदार संघातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आहे. त्यामुळे यवतमाळ येथे पार पडलेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आ. इंद्रनील नाईक यांनी या मतदार संघात बंजारा समाजातील महिला उमेदवारला महायुतीने उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. आता आमदार इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर वर त्यांच्या पत्नी अॅड.मोहिनी इंद्रनील नाईक यांचा मोठा फोटो झळकत असल्याने त्यांनी ही जागा त्यांच्या पत्नीसाठी महायुतीला मागितली होती अशी चर्चा रंगू लागली आहे.

    यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत व्ह्यायची परंतु आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी या मतदार संघात निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्ष फुटी नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी घरोबा केला यावेळी खा. भावना गवळी ह्या एकनाथ शिंदे सोबत जाणाऱ्या पहिल्या खासदार आहेत. त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा शिवसेना, भाजप सोबत गेले असता आमदार इंद्रनील नाईक हे सुद्धा अजित पवार यांच्या सोबत गेले.

    राज्यातील राजकारणात झालेल्या बदलानंतर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघावर सर्वच पक्षाकडून दावेदारी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी ऍड मोहिनी नाईक ह्या लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलल्या जात आहे. परंतु “मेरी झांसी नही दूंगी” म्हणत पुन्हा सहाव्यांदा लोकसभा निवडणूक लढण्यासाठी खा. भावना गवळी सुद्धा सज्ज असल्याचे दिसून येते. सध्या दोन्ही इच्छुक उमेदवार महायुतीत आहेत. मात्र मोहिनी इंद्रनील नाईक यांची बॅनरबाजी आणि खा. भावना गवळी यांची डायलॉगबाजी यातून कोणाला तिकीट मिळेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    कोण आहेत मोहिनी नाईक

    राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहरराव नाईक यांच्या त्या सून असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुसद विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांच्या त्या पत्नी आहेत.

    लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा…! मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंचे सुचक ट्विट

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *