• Mon. Nov 25th, 2024
    मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचा घेतला निर्णय

    अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखोंचा मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर पोहचले आहेत. काहीच तासांमध्ये हा मोर्चा मुंबईत दाखल होऊ शकतो. दिवसेंदिवस या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी होत आहे. मराठा आरक्षणाला आता प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी पाठिंबा दर्शवला आहे. यासाठी त्यांनी पुढील तीन दिवसांसाठी मोठा निर्णय घेतला असून पुढील तीन दिवसाचे आयोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी घेतला आहे.
    निजामी मराठ्यांनी आतापर्यंतची आंदोलने जिरवली, जरांगे पाटील तुमचं आंदोलन जिरवायचं नसेल तर… आंबेडकरांचा सल्ला
    काही महिन्यांपूर्वी मराठा समाजाचे ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्याने आरक्षणाच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी इंदुरीकर महाराजांनी आपले राज्यभरात आयोजित पाच दिवसाचे कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाले असता तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय इंदुरीकर महाराजांनी घेतला आहे.

    मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांसाठी डबेवाला संघटना पुढे सरसावली

    याआधी काही चित्रपट कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढाऱ्यांनी मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दिला होता. आता प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. यासाठी त्यांनी पुढील ३ दिवस सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. २६, २७ आणि २८ जानेवारी रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. मागील आंदोलनाच्या वेळी सुद्धा ५ दिवस कार्यक्रम स्थगित केले होते. इंदोरीकर महाराज यांचे सहाय्यक किरण महाराज शेटे यांनी ही माहिती दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed