• Sun. Sep 13th, 2026

अल्पसंख्याक विकास विभागातर्फे मुंबईत शुक्रवारी ‘एहसास’ कार्यक्रमाचे आयोजन

ByMH LIVE NEWS

Jan 25, 2024
अल्पसंख्याक विकास विभागातर्फे मुंबईत शुक्रवारी ‘एहसास’ कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. २५ : अल्पसंख्याक विकास विभाग व महाराष्ट्र राज्य ऊर्दू साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एहसास’ शायरी, गजल, सुफी या कार्यक्रमाचे शुक्रवार, 26 जानेवारी 2024 रोजी सायं. 5.30 वाजता गेट वे ऑफ इंडिया, मुंबई  येथे आयोजन करण्यात आले आहे.

उर्दू संस्कृती, साहित्य आणि वारसा असा एक अप्रतिम मिलाप पाहण्यासाठी या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभाग व महाराष्ट्र राज्य ऊर्दू साहित्य अकादमी यांनी केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed