हा शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ आहे. जिथे विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला गेला जो इतिहासाशी संबंधित आहे. पण विद्यार्थ्यांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला आणि त्याचे आपआपल्या परीने अर्थ लावायला सुरुवात केली. तेव्हा मुलांनी त्यांच्या डोक्यात जे उत्तर आलं ते द्यायला सुरुवात केली. या व्हिडिओत एक महिला शिक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित प्रश्न विचारत आहे. ते विचारताय की, ‘कुणी कुणाच्या हातावर तुरी दिल्या?’
आग्र्यातून सुटका करून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली, तेव्हा असा शब्द प्रयोग इतिहासात वापरण्यात आला. तुरी देणं म्हणजे एखाद्याला गाफिल ठेऊन त्याची फजिती करणं असा अर्थ होतो. पण तुरी देणं म्हणजे नेमकं काय, हे या मुलांना माहितच नाही किंवा त्यांना हे कधी समजावलं गेलं नाही. ज्यामुळे त्यांचा हा समज झाला आहे.
प्रश्न विचारल्यावर त्यावर एक विद्यार्थी म्हणाला, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या. दुसरा म्हणतो आदिलशाहने अफजलखानाच्या हातावर तुरी दिल्या. तिसरा म्हणतो की शिवाजी महाराजांकडे तुरी जास्त झाल्या होत्या म्हणून त्यांनी औरंगजेबाला दिल्या. कोण म्हणतंय की, औरंगजेबाला वरण आवडत होतं म्हणून त्याला तुरी दिल्या. एक विद्यार्थी तर म्हणतोय की महाराष्ट्रात तुरी जास्त झाल्या म्हणून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या. एका विद्यार्थ्याचं उत्तर ऐकून खुद्द महिला शिक्षकेला हसू आवरेना झालं. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना संदेश पाठवला होता, मला तुरी पाहिजे असंही एकाने उत्तर दिलं.
काही मुलांनी या प्रश्नाचं उत्तर तर बरोबर सांगितलं, पण जेव्हा त्यांना का? असा पुढे संदर्भ विचारण्यात आला, तेव्हा मात्र त्यांना उत्तरं देता आली नाही आणि त्यांनी आपली युक्ती लावून उत्तर दिलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.