• Sat. Sep 21st, 2024
अरे अक्षता कसल्या वाटता, आश्वासन दिलेले १५-१५ लाख वाटा, संजय राऊतांचा भाजपवर बाण

मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने घरोघरी जाऊन अक्षता वाटल्या. अरे अक्षता कसल्या वाटता, आमचे १५ लाख रुपये वाटा. तर तुमच्या अक्षतांचा आम्ही सन्मान केला असता, अशी टोलेबाजी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. राम हा सत्यवचनी होता. प्रभू रामाकडून काही घ्यायचं असेल तर सत्यवचन घ्या. १५ लाखांचं दिलेलं आश्वासन पूर्ण करा, असं सांगत संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं. त्याचवेळी प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठेवेळी व्रतवैकल्य करणाऱ्या पंतप्रधान मोदींवरही त्यांनी निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी गेली ११ दिवस व्रतवैकल्य केले. ११ दिवस ब्लँकेटवर झोपले. देशातील ४० कोटी जनता फुटपाथवर रोजच झोपतेय, त्यांच्याकडे लक्ष द्या. ढोंग कसलं करताय? असं राऊत म्हणाले.

ऐतिहासिक नाशिक नगरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं शिबीर आणि जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना भाजपला लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राजकारण, आगामी लोकसभा निवडणूक, शिवसेनेतली फूट अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नरेंद्र मोदी नाशिकला आले होते. त्यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोदी न्याय देतील, त्यांच्यावर बोलतील असं आम्हाला वाटलं वाटलं. पण त्यांच्यावर एक शब्दही मोदींनी काढला नाही, असा निशाणा राऊतांनी साधला.

विश्वासघात झालाय, आपल्या पक्षप्रमुखाला गादीवरून खाली ओढलंय, रश्मी वहिनी आता बाहेर पडायची वेळ : भास्कर जाधव
अरे अक्षता कसल्या वाटता, आश्वासन दिलेले १५-१५ लाख वाटा

मोठ्या संघर्षानंतर प्रभू रामाची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाली. या पार्श्वभूमीवर भाजपने घरोघरी जाऊन अक्षतांचं वाटप केलं. पण मला त्यांना सांगायचंय, अरे अक्षता कसल्या वाटता, १५ लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते १५ लाख वाटा… तुम्ही १५ लाख वाटण्याचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं असतं तर आम्ही अक्षतांचा सन्मान केला असता, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपचा समाचार घेतला.

आनंदाच्या क्षणी आसवं कशाला गाळता?

शेकडो वर्षानंतर आणि मोठ्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम मंदिरात गेले. सगळ्यांना आनंद झाला. फक्त एकच माणूस या देशात रडला, ती व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. रामाच्या मूर्तीकडे पाहून त्यांना रडू कोसळलं. अहो आनंदाचा क्षण आहे, रडताय कशाला? निवडणुका आल्या की हा माणूस रडतो. पुलवामामध्ये जवानांची हत्या झाली. तेव्हा यांच्या डोळ्यांत अश्रू आले नाहीत. आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तेव्हा हे महाशय रडले नाहीत. महिलांवर बलात्कार होत आहेत, तेव्हा त्यांना वेदना होत नाहीत.पण निवडणुका आल्या की मोदी अश्रू ढाळतात, अशी टीका राऊत यांनी केली.

भाजपमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना मान आणि शंकराचार्यांचा अपमान, मोदींचं हिंदुत्व मला मान्य नाही : उद्धव ठाकरे
नरेंद्र मोदी देशात फक्त २ लोकांना घाबरतात एक म्हणजे शेतकरी आणि दुसरे म्हणजे ठाकरे

प्रभू रामाची मूर्ती पाहून मोदींच्या डोळ्यात अश्रू येतात. मला वाटतं रामाने डोळे वटारून पाहिलं असेल की तुम्ही का आलात म्हणून….. रामाचं राज्य अयोध्येत येत असताना या महाराष्ट्रात गद्दारांचं राज्य आलं. म्हणूनच तख्त बदल दो, राज बदल दो, गद्दारों का राज उखाड दो. नरेंद्र मोदी देशात फक्त २ लोकांना घाबरतात एक म्हणजे शेतकरी आणि दुसरे म्हणजे ठाकरे. आता रामाचा आशीर्वाद आपल्या मिळणार आहे, काळजी नसावी, अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांमध्ये जान भरली.

BJP म्हणजे भेकड जनता पार्टी, देशासाठी मन की बात आणि गुजरातसाठी ‘धन की बात’, Uddhav Thackeray कडाडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed