आपण या धर्मक्षेत्रातून आणि कुरुक्षेत्रातून लढाईला सुरुवात करत आहोत. प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वाधिक संघर्ष पंचवटीत झालेला आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी या भूमीची अधिवेशनासाठी निवड केली त्याला फार महत्त्व आहे. श्रीराम आणि शिवसेनेचे नातं असं आहे, रामाचं धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य, रामाचं शौर्य आहे ते शिवसेनेचे शौर्य आहे, असं संजय राऊत म्हणाले.
संयमी योद्धा ही उपाधी प्रभू श्रीरामाला शोभून दिसत होती. आता ती उद्धव ठाकरेंना शोभून दिसते. रामानं जे अतुलनीय धैर्य दाखवलं ते पंचवटीत दाखवलेलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.रामाच्या हातात आता धनुष्यबाण आहे मला असं वाटतंय रामाच्या हातात मशाल येईल, असं संजय राऊत म्हणाले.
रामाचं धैर्य हे असत्याविरोधात आहे. रामाचं धैर्य हुकूमशाही दूर व्हावी, शिवसेनेवरील अन्याय दूर व्हावा यासाठी आहे. प्रभू श्रीरामावर अन्याय झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या असतील पण राम शांत राहिला होता. त्याप्रमाणं उद्धव ठाकरे देखील शांत आहेत अन् योग्यवेळेची वाट पाहत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
दशरथपुत्र राम अयोध्येत राहिले तोपर्यंत युवराज होते. जंगलातून संघर्ष करुन बाहेर आले तेव्हा भगवान मर्यादा पुरुषोत्तम राम बनले, असं संजय राऊत म्हणाले. रामाचा अपमान झाला तेव्हा त्यांनी योग्य वेळेची वाट पाहिली. उद्धवसाहेब वेट अँड वॉच आपली पण वेळ येईल, असं राऊत यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानं फरक पडत नाही, आपण जिंकू असं राऊत यांनी सांगितलं.
Read Latest Maharashtra News And Marathi News