• Mon. Nov 25th, 2024
    लोकसभा : आप्पा हॅट्रिक करणार की ठाकरेंचा शिलेदार भारी पडणार? मावळमध्ये काय होईल?

    पुणे : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात देखील चुरस वाढू लागली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक वर्ष उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले श्रीरंग बारणे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे गट बॅक फूटवर आहे. मात्र दुसरीकडे अनेक वर्ष अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले संजोग वाघेरे यांनी शिवबंधन हाती बांधत उद्धव ठाकरे यांच्यासोबत जात मावळ लोकसभेसाठी ‘है तय्यार हम’ असे संकेत दिले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवरच सेना प्रवेश केल्याने संजोग वाघेरे यांची उमेदवारी नक्की मानली जातीये. त्यामुळे येणाऱ्या काळात श्रीरंग बारणे यांना संजोग वाघेरे सारख्या अनुभवी नेत्याचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांचा गटही मावळमध्ये लढण्यासाठी चाचपणी करतो आहे. अजूनपर्यंत तरी अजित पवार यांनी मावळ लोकसभेवर दावा सांगितलेला नाहीये.

    श्रीरंग बारणे यांनी मागच्या वर्षी मावळ लोकसभेवर आपली छाप सोडली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र श्रीरंग बारणे यांच्यासमोर पार्थ यांचा टिकाव लागला नाही. पार्थ यांना मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. पार्थ यांचा पराभव हा अजित पवार यांना मोठा धक्का होता. त्यामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली होती. मावळ लोकसभेसाठी भाजप नेते बाळा भेगडे, उध्दव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे, पार्थ पवार हे इच्छुक उमेदवार आहेत.

    वेध लोकसभा निवडणुकीचा : तीन राज्यांच्या विजयाने मनोबल उंचावले तरी भाजपसाठी सोपी नसेल पुणे लोकसभा!
    मतदारसंघाची रचना झाल्यानंतर गजानन बाबर यांच्या रुपाने शिवसेनेला पहिला खासदार २००९ साली मिळाला. त्यावेळी शिवसेनेने आपली ताकद या मतदार संघात वाढवण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१४ आणि २०१९ साली श्रीरंग बारणे यांच्या रुपाने शिवसेनेला दुसरा खासदार मिळाला. मात्र शिवसेनेत फूट पडली आणि श्रीरंग बारणे शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले.

    सर्वच पक्ष सक्रिय

    मावळ लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद लावण्यास सुरुवात केली असून स्थानिक आमदारांनी राष्ट्रवादीचाच खासदार होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षातच खासदारकीसाठी शर्यत लागते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

    वेध लोकसभा निवडणुकीचा : कल्याण सर्वाधिक चर्चेत, २०२४ च्या निवडणुकीत काय होणार?

    संजोग वाघेरेंच्या एन्ट्रीने उद्धव ठाकरे गटाला उभारी

    श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मावळ लोकसभेसाठी उमेदवार नव्हता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या हाताला अजितदादांचा शिलेदार लागल्याने त्यांची मावळ लोकसभेसाठीची चिंता मिटली असल्याचे बोलले जात असून उद्धव ठाकरे यांस मावळ लोकसभेची जागा जिंकून आणणारच असा शब्दच त्यांनी दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि वाघेरे यांनी मावळ लोकसभेची तयारी सुरू केल्याचे दिसते आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे आपली पहिली सभा या मतदार संघात घेणार आहे.

    वेध लोकसभा निवडणुकीचा : बारामतीत यंदा भाजप उमेदवार देणार की दादांचा उमेदवार सुप्रियाताईंना नडणार?

    शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंची तयारी

    मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीतून कोण लढणार, जागेची अदलाबदली होणार का? हे अद्याप जरी ठरलेले नसले तरी यात अंतिम लढत ही शिंदे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यातच होणार असल्याचे चित्र आहे. कारण ही जागा जिंकून उद्धव ठाकरे हे शिंदे गटाला आपली ताकद दाखवून द्यायचा नक्कीच प्रयत्न करतील. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे.

    वेध लोकसभा निवडणुकीचा : शिरूर लोकसभेसाठी अनेक इच्छुक, अजित पवारांचं अमोल कोल्हेंना आव्हान, उमेदवार कोण?
    मावळ लोकसभा मतदार संघामध्ये कोणते विधानसभा मतदारसंघ?

    -चिंचवड
    – पिंपरी
    – पनवेल
    – उरण
    – कर्जत
    – मावळ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *