• Mon. Nov 25th, 2024
    एक-दोन अपत्यांवरच थांबा, नाहीतर ब्रह्मदेव आला तरी… नेमकं काय म्हणाले अजित पवार?

    पिंपरी चिंचवड : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच टोलेबाजी केली. मी सकाळी लवकर आल्याने काही जणांची अडचण झाली, असा टोला अजितदादांनी लगावला. तर त्यानंतर बोलताना, एक-दोन अपत्यांवरच थांबा, नाहीतर ब्रह्मदेव आला तरी तुम्हाला घरं बांधून देऊ शकणार नाही, असा सल्लाही अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मिश्कील शैलीत दिला.

    अजित पवार वक्तशीरपणासाठी किंबहुना वेळेआधी पोहोचण्यासाठी प्रख्यात आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकर हजेरी लावली. “आज सकाळी नऊ वाजता कार्यक्रम घेतला, काही जणांची थोडी अडचणच झाली असेल, परंतु सकाळी लवकर सुरुवात केली की कामं देखील लवकर होतात” असं अजितदादा म्हणाले.

    उद्धव ठाकरेंचा दणका, भाजप-संघातील ११ नेत्यांचा ‘मातोश्री’वर पक्षप्रवेश
    त्याचप्रमाणे मिश्कील शैलीत कार्यकर्त्यांचे कान टोचण्यातही अजित पवार यांचा हातखंडा आहे. “माझी विनंती आहे, की बाबांनो तुम्ही एक किंवा दोन अपत्यांवरच थांबा, तेवढं मात्र करा, कारण मी बघतोय ३३ वर्षांपूर्वी… १९९१ मध्ये मी खासदार झालो, तेव्हा तिथलं पॉप्युलेशन केवढं होतं, आणि आता इतक्या वर्षांनी किती झालंय… त्यामुळे ब्रह्मदेव जरी आला ना, तरी तिथं सगळ्यांना घरं बांधून देऊ शकत नाही.. म्हणून..” असं अजितदादा म्हणाले.

    उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, आडम मास्तरांचा घोळ, म्हणाले फडणवीसांच्या जोडीने नाव तोंडात बसलं
    “आमची पण काही जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे, मी अजिबात नाकारत नाही” असं सांगायला अजित पवार विसरले नाहीत. परंतु अजितदादा मिश्किल शैलीत तुफान फटकेबाजी करत असताना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या टाळ्या आणि हशांचा पाऊस पडत होता.

    मूर्खांनी व्हिडिओ व्हायरल केला, पण आम्ही रुबाब दाखवणारे नव्हे तर सामावून घेणारे; अजितदादांचं स्पष्टीकरण

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed