मोदींनी भर सभेत भावूक होऊन भाषण केले मात्र मोदींनी किंवा भाजपने याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. मोदी सोलापुरात येऊन रे नगर गृहप्रकल्पाचा उदघाटन करून गेले,व्यासपीठावर थांबून मोदींना अश्रू अनावर झाले. लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. सोलापुरात अनेक लोक आजही बेरोजगार आहेत.महागाई जबरदस्त वाढली आहे या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.
ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे
केंद्रीय संस्था ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे. एकच सरकार सत्तेत असल्याने ईडीचा वापर करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.रोहित पवारांना ईडीची नोटीस आल्यावर शरद पवारांनी ईडीची भीती विरोधकांना दाखवली जातं आहे अशी टीका केली. अनिल देशमुख यांना सहा महिने तुरुंगात पाठवले,सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले, हे सरकार ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
अजित पवारांच्या भाषणाकडे जास्त लक्ष देऊ नका
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे येथील सहकारी बँकेच्या कार्यक्रमात शरद पवारांच नाव न घेता टीका केली होती.वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाहीत ,असे अजित पवार यांनी भाषणातून खंत व्यक्त केली होती.सोलापूर शहरात असताना शरद पवारांनी अजित पवारांच्या भाषणाला प्रतिउत्तर दिले आहे.अजित पवार हे तरुणच होते,त्यांना संधी कुणी दिली.त्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही असे शरद पवारांनी सांगितलं.