• Sat. Sep 21st, 2024

सांगलीत शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग; गवती चहाची लागवड, मुंबईकरांना भुरळ, मिळतोय चांगला नफा

सांगलीत शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग; गवती चहाची लागवड, मुंबईकरांना भुरळ,  मिळतोय चांगला नफा

सांगली: जिल्ह्याच्या पश्चिम भागाची शेती म्हणजे पारंपारिक ऊस शेतीचा खजिना. वर्षानुवर्षे ऊस आणि आंतरपिकांचे उत्पादन घेऊन इथले शेतकरी पैसे कमावतात. मात्र, शिराळा तालुक्यातील बिऊर येथील एका शेतकऱ्याने अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिऊर गावची आता गवती चहाचं गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. गावातील ७० हुन अधिक शेतकऱ्यांनी ऊस शेतीला फाटा देत गवती चहाची लागवड केली आहे.
पारंपरिक शेतीला फाटा, ऊस शेतीला पर्याय शोधला,सांगलीच्या बिऊरच्या शेतकऱ्यांकडून गवती चहाची शेती,मुंबईत विक्री
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड करून मुंबईतील बाजारपेठेत अल्पावधीत ओळख निर्माण केली आहे. शेतीवर उदरनिर्वाह असणारे शेतकरी पैसा मिळवून देणाऱ्या पिकाकडे वळत असून नवनवीन प्रयोग करत आहेत. अलीकडच्या काही वर्षात वातावरणातील बदल अवकाळी पावसाचा फटका अन अशा अनेक कारणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी शेतीवर उदरनिर्वाह असणाऱ्या शेतकऱ्यांचा वर्षभर उत्पादन देणाऱ्या पिकाकडे कल वाढला आहे.

गवतीच्या ही वनस्पती असून एक बारमाही सुवासिक गवत आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीनंतर चार-पाच महिन्यांनी पहिली कापणी सुरू होते. त्यानंतरची कापणी दर तीन महिन्याने करता येते साधारणपणे वर्षात चार कापण्या होतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून या परिसरात काही शेतकऱ्यांनी हे पीक घ्यायला सुरुवात केली आहे. अनुभव नसल्याने थोडाफार तोटाही सहन करावा लागला. मात्र नंतर तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय खत आणि जिवाणू खतांचा वापर केला. पाण्याचे नियोजन वेळेवर अंतर मशागत कीटकनाशकांचा वापर याची सांगड घालून उत्पादन घ्यायला सुरुवात झाली.

भाजपकडून ऑफर आल्याची चर्चा, राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं

मुंबईच्या बाजारपेठेत या शिराळा तालुक्यातील अनेक व्यावसायिक आहेत. त्यामुळे येथे माल पाठवायला सुरुवात झाली. कमी खर्चात उसापेक्षा जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड केली आहे. यामुळे अनेक जण आवर्जून गवती चहा पितात. त्याचबरोबर यामध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. गवती चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे मुंबई मार्केटमध्ये मोठी मागणी आहे.

गवती चहाला सरासरी ३० ते ४० रुपये प्रति किलो दर मिळतो. तसेच लागवडी पूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी ओळी ४४० आर एल १६ या जातीची निवड करावी. हेक्टरी २२ हजार कोंब लागतात. पहिल्या दोन वर्षात हेक्‍टरी २० टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते, असे शेतकरी वर्गाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed