• Tue. Sep 22nd, 2026

परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी तीन लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर

ByMH LIVE NEWS

Jan 19, 2024
परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी तीन लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर

मुंबई, दि. 19 : राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी रुपये 3.63 लाख निधी वितरित  करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती व गोंदिया या 14 जिल्ह्यातील ‘आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजनासाठी’ सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी रुपये 3.63 लाख (रुपये तीन लाख त्रेसष्ठ हजार फक्त) इतकी रक्कम खर्च करण्यास वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed