रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी व नतमस्तक होऊन निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली. रामहरी मेटे यांच्याकडे युवा जिल्हाध्यक्ष पद होते. परंतू मेटे यांच्या निधनानंतर त्यांनी हे पद सोडले होते. शिवंग्राममधील अंतर्गत धुसफूस आणि होत असलेली घुसमट यामुळेच त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. रामहरी मेटे बाहेर पडणे हे शिवसंग्रामला मोठा धक्का समजला जात आहे.
मागील काही दिवसांपासून ते शिवसंग्रामपासून दोन हात लांब होते. ते नाराज असल्याचीही चर्चा होती. शिवसंग्राममध्ये ठराविक लोकांचीच जास्त चलती आहे, असे त्यांनी अनेकदा कार्यकर्त्यांजवळ बोलून दाखविले होते. त्यामुळेच त्यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलून शिवसंग्राममधून बाहेर पडत जय शिवसंग्राम ही स्वतंत्र संघटना उघडली आहे. शिवसंग्राममधून बाहेर पडल्याची घोषणा त्यांनी आज केली. यामुळे शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे.
मात्र यावेळेस चर्चा ही प्रॉपर्टीची देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे कारण आतापर्यंत स्वर्गीय विनायक मेटे यांनी अनेकांना आपला आयुष्य सुधारण्यासाठी संधी दिली या संधीत असलेले त्यांचे बंधू देखील आहेत. मात्र या बंधूंनी देखील दिलेल्या संधीचं सोनं करण्याऐवजी इतर गोष्टीतही लक्ष दिल्याची चर्चा पाहायला मिळते. मात्र ही फक्त चर्चा की सत्य हा मात्र संशोधनाचा भाग आहे.
यात आता याच बंधूंनी स्वतंत्र पक्ष काढत आपण शिवसंग्राम पासून वेगळे झाल्याचे स्पष्ट केला आहे. यामध्ये आता दिवंगत नेते स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मिळते यांना या गोष्टीचा किती फरक पडणार हे तर पाहणे गरजेचे आहे. आता आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांचे बंधू रामहरी मेटे यांना नेमके कोणत्या पक्षाचे पाठबळ मिळेल. त्याचबरोबर भाऊ यांचे निधन झाल्यानंतर शिवसंग्रामला राम राम ठोकण्याचं का निर्णय घेतला? यात नेमकं काय घुसमट होती? याची उत्तरे मिळतील.