• Mon. Nov 25th, 2024
    फलटणला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, पाणी चोरणाऱ्यांना आम्ही पकडणार: देवेंद्र फडणवीस

    सातारा : फलटण तालुक्याला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती. मी राज्याचा गृहमंत्री असल्यानं चोरी केलेल्याला पकडण्याचं काम माझ्या खात्याचं आहे. त्याला आम्ही पकडूच, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी केली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीरा देवघर उजवा कालव्याचे बंदिस्त पाईप लाईन कामाचा शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

    पश्चिम महाराष्ट्राच्या एका नेत्यावर फडणवीसांनी ही टीका केली. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या पवारांवर टीका केली? शरद पवार की अजित पवार…,याची चर्चा मात्र सुरु झाली. २३ वर्षानंतर फलटण तालुक्याच्या हक्काचे पाणी या तालुक्याला मिळाले आहे.
    नेहमी लोकं उन्हात आणि नेते सावलीत असतात पण आज नेते आणि लोकं दोन्ही उन्हात आहेत.
    तरुणी झोपेत असताना घरात शिरला; चाकूने वार, नंतर स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न, तरुणाच्या कृत्यानं गावात खळबळ
    ज्याला दुष्काळी म्हटले त्याचा डाग मिटण्याचे काम करणार आहोत. आज हक्काचे पाणी मिळणार आहे. आज फलटणमध्ये रामायणाचा नवा अध्याय सुरू करत आहोत. येत्या काळात नवीन भारत आणि महाराष्ट्र उभा राहणार आहे. अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या, पण पाण्याची चोरी पाहायला मिळाली नाही. गृहमंत्री मीच आहे. जो कुणी चोरली त्याला दंड करण्याची जबाबदारी आमची आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज २३ वर्षांनी पाणी तुम्हाला मिळत आहे. हे काम जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पैशाची चणचण भासणार नाही.
    वेध लोकसभा निवडणुकीचा : शिर्डीत महायुतीची ताकद पण पवार-ठाकरेंना मोठी सहानुभूती, लोकसभेला काय होऊ शकतं? वाचा…
    लोकांचे वय वाढते, पण शहाजी बापूचे वय कमी व्हायला लागले. ते स्मार्ट दिसायला लागले आहेत, अशी मिस्कील टिप्पणी करत शहाजी बापूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
    HDFC बँकेच्या गुंतवणुकदारांना १ लाख कोटींचा झटका, शेअरमध्ये ३ वर्षातील सर्वात मोठी घसरण
    लोकांचे वय वाढते, पण शहाजी बापूचे वय कमी व्हायला लागले. ते स्मार्ट दिसायला लागले आहेत, अशी मिस्कील टिप्पणी करत शहाजी बापूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.

    आपण गेल्या १३ महिन्यात ८ योजनांना मान्यता दिलीय. मीही विदर्भ या दुष्काळी भागातून येतो. त्यामुळे याचे दुःख मला माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींना भेटून सांगितले, की आमच्या शेतकऱ्यांना योजना द्या. त्यांनी बळीराजा योजना दिली, असेही फडणवीस यांनी सांगितले.

    दुष्काळ संपवण्यासाठी शेतीच्या बांधावर पोहचवणार आहे, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. या भागात तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी उद्योग आणण्याचे काम करत आहे. जे काम करतात, त्यांना आशीर्वाद द्या. आम्ही या नेत्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. आपल्या जिल्ह्यात नवीन कॉरिडॉर होत आहे. त्यामुळे येथील तरुणांना रोजगार येणार आहेत, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    पुराचे पाणी कुणाच्या मालकीचे नाही म्हणून आम्ही योजना करण्याचे आखली. हे पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवले, तर मोठा फायदा येथील जनतेला होईल. हा ३३०० कोटींचा प्रकल्प आहे. त्याला केंद्र सरकारने तत्वतः मान्यताही दिली आहे. पुराचे पाणी शहरात घुसणार नाही त्याचा फायदा दुष्काळी भागातील १० लाख कुटुंबातील लोकांना होणार आहे. त्यामुळे चार लाख लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, अशी फडणवीस यांनी शेवटी सांगितले.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *