• Mon. Nov 25th, 2024

    निरा देवघर उजव्या मुख्य कालव्याच्या बंदिस्त नलिका कालव्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

    ByMH LIVE NEWS

    Jan 17, 2024
    निरा देवघर उजव्या मुख्य कालव्याच्या बंदिस्त नलिका कालव्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

    सातारा, दि.१७ : निरा देवघर प्रकल्प ता. भोर जि. पुणे अंतर्गत निरा देवघर उजवा मुख्य कालवा किमी 66 ते 87 मधील बंदिस्त नलिका कालवा आणि निरा देवघर प्रकल्पामधून 0.93 टी.एम.सी. पाणी धोम बलकवडी प्रकल्पामध्ये टाकण्याच्या कामाचा शुभारंभ व भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले.

    काळज ता. फलटण येथे झालेल्या कार्यक्रमास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, शहाजीबापू पाटील,जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.

    निरा देवघर धरण हे नीरा नदीवर असून याची पाणी साठवण क्षमता ११.९१ टि.एम.सी. इतकी आहे. निरा देवघर उजवा कालव्याच्या एकूण १५८ किमी लांबी पैकी ६५ किमी पर्यंतचे कालव्याचे काम पारंपरिक पद्धतीने पूर्ण झाले आहे. उर्वरित काम बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे किमी ६६ ते ८७ व शाखा कालव्याच्या निविदेची कार्यवाही पूर्ण झालेली आहे.

    प्रकल्पावर माहे डिसेंबर २०२३ अखेर ९१७.८१ कोटी खर्च झालेला आहे. सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये १०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

    या कामाच्या शुभारंभ व भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह.वि. गुणाले, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व काळज येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed