• Fri. Nov 29th, 2024
    आधी पाठिंबा दिला, नंतर युटर्न घेतला, रामदास आठवलेंनी आंबेडकरांसमोर एक अट ठेवली!

    वाशिम: अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार, अशी घोषणा रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. नंतर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही देऊ, अशी सारवासारवही त्यांनी नंतर केली. वाशीम जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आठवले यांनी सोमवारी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला.
    अमित शाहांवर दुःखाचा डोंगर, ऐन मकरसंक्रातीच्या दिवशी मोठ्या बहिणीचं निधन
    ते म्हणाले की, महायुतीमध्ये लोकसभेचे जागावाटप लवकरात लवकर होऊन आम्हाला शिर्डी, सोलापूरबरोबर विदर्भातील एक जागा देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. महायुतीचे जागावाटप लवकर झाले तर उमेदवार जाहीर करण्यासाठी आणि त्याला प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. समाजकल्याण विभागाचे बजेटही त्यांनी मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. त्यामुळे २०१९मध्ये आम्हाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत आम्ही ४००चा आकडा पार करू. महाराष्ट्रात ४५पेक्षा जास्त जागा जिंकू, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

    बीडच्या रेल्वे स्थानकाला गोपीनाथ मुंडेंचं नाव? गोपीचंद पडळकरांच्या मागणीवर बीडकरांना काय वाटतं?

    राम मंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होत आहे. अयोध्येतच मध्येच मोठी मशीद उभी राहत आहे. त्यामुळे साहाजिकच आयोध्येमध्ये गौतम बुद्धांचे मंदिर व्हावे, अशी आमची मागणी राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद मिटविण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. यासंदर्भात दोघांचीही भेट घेणार आहे. मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तामिळनाडूचा फॉर्म्युला उपयोगी ठरू शकतो, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed