• Mon. Nov 25th, 2024
    संघाच्या स्वयंसेवकाचा जळगाव लोकसभेवर दावा, भाजप विद्यमान खासदाराचं तिकीट कापणार?

    जळगाव : अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अविनाश पाटील यांनी जळगावात जनजागृतीपर फलक लावले आहेत. या फलकांच्या माध्यमातून अविनाश पाटील हे चर्चेत आले आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी जळगावची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत उमेदवारीबाबत दावा केला आहे.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले अविनाश पाटील हे राजकारणात सक्रिय नाहीत किंवा त्यांच्याकडे भाजपचं कुठलंही पद देखील नाही. असं असतानाही अविनाश पाटील यांनी जळगाव लोकसभा लढवण्याची इच्छा भाजपच्या वरिष्ठांकडे बोलून दाखवली आहे.

    महाविकास आघाडी सोडली, पण दापोलीत ठाकरेंसोबत अजितदादा गटाची सत्ता कायम, कार्यकर्ते संभ्रमात
    त्यामुळे गेल्या वर्षांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ऐनवेळी उमेदवार बदलण्याची भाजपची परंपरा यावर्षीही कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान खासदारांना डावलून भाजप नवीन चेहरा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून अविनाश पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगली आहे.

    नमो महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी नारी शक्तीची पायपीट, उन्हाचा त्रास, जेवणाचीही गैरसोय
    जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर दोन मतदारसंघ आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उन्मेष पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात लढत झाली. त्यात भाजपच्या उन्मेष पाटलांनी बाजी मारत खासदारकी मिळवली. तर रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या सलग दुसऱ्यांदा खासदार आहेत.

    जे आज झालं ते परत नको, मुंडे साहेबांचा फोटो वगळून कुठलेही कार्यक्रम सहन करणार नाही: प्रीतम मुंडे

    Read Latest Maharashtra Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed