• Mon. Nov 25th, 2024
    बाईक अन् कारची समोरासमोर धडक, भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा हंबरडा

    धनाजी चव्हाण, परभणी : पोखर्णी – पाथरी मार्गावरील भारसवाडाजवळ रविवारी चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहन जळून खाक झाले. यात प्रभाकर मारोतराव गवारे (५६, रा. पाथरी) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

    प्रभाकर गवारे हे सोनपेठ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. रविवारी रात्री ते परभणी येथून सोनपेठकडे दुचाकीने जात होते. दरम्यान, भारसवाडा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी क्रमांक (एम एच १२ एम एल ४७५०) वाहनांची समोरासमोर धडक झाली. वाहनाच्या धडकेनंतर गवारे हे बाजूला फेकले गेले. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. दरम्यान काही वेळाने दोन्ही वाहनांना आग लागल्याने त्या खाक झाल्या.

    ‘अटल सेतू’चा वापर सहल अन् मौजमजेसाठी, जीव धोक्यात घालून फोटोशूट, बेशिस्तांवर कारवाईची मागणी
    चार चाकी वाहनातील प्रवासी आग लागण्याअगोदरच घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी.आर. बंदखडके, बळीराम मुंडे, विठ्ठल कुकडे यांनी घटनास्थळी गाव घेत मयत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगितले. अपघात इतका भीषण होता की काही क्षणात दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या.

    सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे २०१९ साली सोनपेठ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले होते. काही महिन्यापूर्वी त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

    संक्रांतीमुळे भाज्या कडाडल्या, वांगी- गाजर- मटार या भाज्यांना मोठी मागणी, जाणून घ्या ताजे दर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed