• Sat. Sep 21st, 2024

दिघा गाव रेल्वे स्थानकावरून पहिली ट्रेन ठाण्याकडे रवाना; मात्र श्रेयवादावरुन भाजप आणि ठाकरे गटात जुंपली

दिघा गाव रेल्वे स्थानकावरून पहिली ट्रेन ठाण्याकडे रवाना; मात्र श्रेयवादावरुन भाजप आणि ठाकरे गटात जुंपली

नवी मुंबई: ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीनच बांधण्यात आलेल्या दिघा गाव स्टेशनचे लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडला. दिघा गाव रेल्वे स्थानकावरून पहिली ट्रेन ही ठाण्याकडे रवाना करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, भाजपचे माजी खासदार संजीव नाईक तसेच मनसेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते या लोकार्पण सोहळ्यावेळी उपस्थित होते.
भरत गोगावलेंना हिसका दाखवायचा, काहीही करून महाड जिंकायचं, ठाकरेंनी चंग बांधला, निकालाच्या तिसऱ्याच दिवशी उमेदवार ठरवला!
दिघा रेल्वे ट्रेनला हिरवा कंदील देताच राजन विचारे आणि संजीव नाईक यांच्या हस्ते ट्रेन पुष्पगुच्छ देत सत्कार केला. सात ते आठ वर्षांपासून दिघा स्टेशन धूळ खात पडलेले होते. मात्र आज पंतप्रधान मोदी यांनी रिमोटद्वारे उद्घाटन केले आले असून ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र त्यापुर्वी भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आलेले पाहायला मिळाले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप आणि शिवसेना एकत्र येत घोषणाबाजी सुरू होती. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोदींचा जयजयकार तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंचा जयजयकार सुरू होता.

दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी सुरू होती. राजन विचारे यांचे श्रेय असल्याचे ठाकरे गटाकडून बोलले जात आहे. तर भाजपकडून संजीव नाईक यांचे श्रेय असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईमधील मेट्रो असेल दिघा रेल्वे स्थानक असेल ही दोन्ही स्थानके ठाकरे गटाचे खासदार राजन विचार यांनी आंदोलने केली. सगळ्यांच्या मोहीम राबवल्या. त्यानंतर सुरू झालेली आहेत. त्यामुळे कुणी श्रेय घेण्याचं विचार करू नये.

घराणेशाहीच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर, मोदींसोबत व्यासपीठावर असणाऱ्या नेत्यांचा हिशोब काढला

ट्रेन सुरू होणार असल्याचे समजताच दिघा रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते आले. मात्र यापूर्वी कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते येऊन ट्रेन चालू करा, असं बोललं नव्हतं. मात्र आज श्रेयासाठी सर्वांनाच जाग आलेली आहे. मात्र जनतेला माहिती आहे खरी कामे कोणी केलेली आहेत. खरं श्रेय कुणाचा आहे हे सांगायची गरज नाही. येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जनता यांना उत्तर देईल, असे मत खासदार राजन विचार यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed