• Mon. Nov 25th, 2024

    जुन्नरसाठी शरद पवारांना मिळाला खंदा शिलेदार! सत्यशील शेरकर यांच्या नावाची घोषणा होणार?

    जुन्नरसाठी शरद पवारांना मिळाला खंदा शिलेदार!  सत्यशील शेरकर यांच्या नावाची घोषणा होणार?

    जुन्नर, पुणे : जुन्नर तालुका आता वेगळ्या गोष्टीने चर्चेत आला आहे. काँग्रेसचे युवा नेते आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस आहे. दुसऱ्या दिवशी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हजेरी लावणार आहे. त्यापूर्वी सत्यशील शेरकर हे शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे उमेदवार सत्यशील शेरकर तर नाहीत ना? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

    शुक्रवारी सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कारखान्याच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार यांची एंट्री हे सर्व योगा योग तर नाहीत ना. १२ जानेवारी रोजी सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस आणि शनिवारी विघ्नहर कारखण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी शरद पवार सकाळी १० वाजताच शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शेतकरी मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार घोषणा करतात की अजून चाचपणी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    ना साहेब, ना दादा…शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत मोठी घोषणा..! आमदार अतुल बेनके यांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..

    जुन्नर तालुक्यात शेरकर यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बैलगाडा शर्यतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सत्यशील शेरकर हे शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.

    अतुल बेनके खरंच तटस्थ आहेत का? पत्रकाराचा प्रश्न-शरद पवारांचं भारी उत्तर, आमदार-खासदारही हसले

    राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट, असे दोन गट पडले आहेत. त्यात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे शरद पवार नव्या चेहेऱ्याच्या शोधात असल्याने जुन्नरसाठी विधानसभेचा उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतात का? याची उत्सुकता जुन्नरवासीयांना लागली आहे. शरद पवार हे सत्यशील शेरकर यांना आपल्या पक्षात घेतात की ही जागा काँग्रेसला सोडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर शरद पवार यांनी सत्यशील शेरकर यांना उमेदवारी दिली तर जुन्नरच्या राजकारणात अनेक बदल होताना पहायला मिळणार आहे. त्यामुळे शरद पवार याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *