• Sat. Sep 21st, 2024

घटस्फोट नको, नांदायचे आहे! ८८ संसार फुलले, पोलिसांच्या समुपदेशानंतर जोडपे पुन्हा एकत्र

घटस्फोट नको, नांदायचे आहे! ८८ संसार फुलले, पोलिसांच्या समुपदेशानंतर जोडपे पुन्हा एकत्र

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलिसांच्या भरोसा सेलअंतर्गत असलेल्या सहायता कक्षाने केलेल्या प्रयत्नामुळे गेल्या आठ महिन्यात ८८ जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले. या कक्षात केवळ अन्यायग्रस्त महिलांचा तक्रारी घेऊन येतात असे नाही, तर गेल्या काही महिन्यांत पत्नीपीडित असलेल्या १२ पुरुषांनीही मदतीसाठी धाव घेतल्याचे समोर आले आहे.

कौटुंबिक वादाच्या अनेक तक्रारी भरोसा सेलमध्ये येतात. तक्रारीच्या अनुषंगाने पती-पत्नीचे समुपदेशन केल्या जाते. छोट्या कारणामुळे, कलहामुळे कुटुंब मोडू नये; तसेच कोणावरही अन्याय होता कामा नये या दृष्टीने कक्षातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करतात. दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून मार्ग काढला जातो. या कक्षामुळे अनेकांचे संसार तुटण्यापासून वाचले असून, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यातही या कक्षाची मोठी भूमिका राहिली आहे. दरम्यान, जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत असलेल्या महिला सहायता कक्षात गेल्या नोव्हेंबर अखेर ४१६ तक्रार अर्ज प्राप्त झाले.

कक्षाचे प्रमुख आरती जाधव आणि पथकाच्या सदस्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने पती-पत्नी व संबंधितांना वेळोवेळी बोलवून घेऊन त्यांचे समुपदेशन केले. ‘पथकाने केलेल्या प्रयत्नामुळे ८८ जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले. मात्र, तडजोडीत ज्यांचे जमले नाही त्यांनी अखेर कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. काही प्रकरणे पोलिस ठाण्यात वर्ग केली जातात. यात ६८ प्रकरणे कक्षस्तरावर प्रलंबित असून, १६६ प्रकरणे पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहेत. कोर्टात धाव घेणे; तसेच वारंवार सूचना देऊनही कक्षात हजर न राहिल्यामुळे ७२ प्रकरणांची फाइल बंद झाली आहेत,’ अशी माहिती कक्षप्रमुख जाधव यांनी मटाशी बोलताना दिली.

‘आलेल्या तक्रारीचा अभ्यास केला जातो. छोट्या किंवा किरकोळ कारणांमुळे कुटुंब मोडू नये; तसेच कोणावरही अन्याय होता कामा नये, या दृष्टीने प्रयत्न केले जातात. दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून मार्ग काढला जातो. समुपदेशन केले जाते,’ असेही त्यांनी नमूद केले.
तहसीलदारांच्या कक्षात विषप्राशन; पूरप्रश्नाकडे दुर्लक्षावर यवतमाळच्या शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल
पीडित पुरुषांनीही घेतली मदत

या सहायता कक्षात तक्रार दाखल करण्याऱ्यांमध्ये पीडित महिलांची संख्या जास्त असली, तरी गेल्या काही वर्षांत पत्नी, सासुरवाडीच्या लोकांमुळे छळ होत असल्याचे गाऱ्हाणे घेऊन पुरुषही या कक्षाकडे धाव घेत आहेत. गेल्या काही महिन्यांत १२ पुरुषांनी मदतीसाठी सहायता कक्षाकडे धाव घेतली आहे.

प्रमुख तक्रारी –

कौटुंबिक कलहाच्या प्रकरणात प्रामुख्याने पैशांसाठी त्रास, पतीचे दारूचे व्यसन, पती घरात पैसे देते नाही, मोबाइलचा अतिवापर त्यावरून होणारे वाद, पैशांची चणचण, एकत्रित कुटुंब नको, सासुरवाडीच्या लोकांचा संसारातील छोट्या मोठ्या गोष्टीत लक्ष घालतात, घरातील लोकांनी अपमानास्पद वागणूक देणे, सन्मान न करणे, पत्नी नेहमी माहेरी जाते, पत्नीला नांदण्यास तयार नाही किंवा येत नाही, संशय घेणे आदी स्वरूपाच्या तक्रारी प्रामुख्याने कक्षाकडे येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed