• Mon. Nov 25th, 2024
    वर्ल्ड कप फायनलची मॅच गुजरातऐवजी मुंबईत झाली असती तर जिंकलो असतो – आदित्य ठाकरे

    नवी मुंबई: युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे दिघा रेल्वे स्थानकासाठी मैदानात उतरले आहेत. सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे दिघा स्थानक गेल्या ९ महिन्यांपासून उद्घाटनाविना बंद आहे. हे स्थानक सुरू करावं, या मागणीसाठी आदित्य ठाकरेंनी आज ऐरोलीत धडक देत दिघा रेल्वे स्थानक सुरू करण्यासंदर्भात सरकारला इशारा दिला आहे.

    अनेक महिने, अनेक दिवस हे दिघा स्टेशन तयार असून आपण वाट बघतोय की स्थानकावर ट्रेन कधी येईल जसा हा प्रश्न पडला आहे. तसा देशाला प्रश्न पडला आहे की हेच का अच्छे दीन? गेल्या १० वर्षात आले का अच्छे दिन? १५ लाख आले का तुमच्या खात्यात? असा उपस्थितांना आदित्य ठाकरेंनी सवाल केला. जनतेला अच्छे दिन आले की नाही, ते माहीत नाही पण खोकेदारांकडे अच्छे दिन आले आहेत, असा घणाघात त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.
    राज ठाकरे ऑन ग्राऊंड, खालापूर टोलनाक्यावर अधिकाऱ्यांना ठाकरी बाणा दाखवला, वाहनांच्या रांगा लागल्यानं खडसावलं
    मी आधीपासून सांगतोय २०२४ हे वर्ष आपले आहे. मोठे काही करू नका. नाहीतर पोलिसांवर प्रेशर येईल की उद्घाटन करतात की काय, मुंबईत असाच एक ब्रीज आहे. त्याला मी डिले ब्रीज नाव दिले. आपल्याला ट्रेन चालवला येत नाही आणि यांना सरकार चालवता येत नाही. मी सरकारला विचारतो आहे की अन्याय जर करायचा आहे तर महाराष्ट्र एकमेव राज्य असा काही कलम केले आहे का ? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारला केला आहे.

    वेदांता गेला की नाही? आपल्या तरुणांनी जायचे कुठे? वेदांतामुळे दीड लाखांचे रोजगार आपल्याकडून गेले. पण गेले कुठे तर गुजरात मध्ये. साधी वर्ल्ड कप फायनल पण गेली कुठे तर गुजरात, इथे असती तर आपण जिंकलो असतो. जिथे जिथे वाद झाले तिथे तिथे त्यांचा पक्ष जिंकला आहे. MTHL अडीच महिने तयार आहे, पण उद्घाटन नाही. काल जाऊन फोटोग्राफी करून आले. जर १५ जानेवारीपर्यंत उद्घाटन केले नाही तर आम्ही जाऊन करू. उरण रेल्वे, मंकोली ब्रीज तयार आहे. हे स्टेशन ९ महिने झाले तयार आहे. लाईट सुरू आहे, सफाई सुरू आहे, पैसे कोण भरते आहे तर आपण. रेल्वे मंत्री यांना विनंती करतो हवं तर सेल्फी काढून पाठवतो, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारला विनंती वजा इशाराच आता सरकारला दिला आहे.

    देशात सध्या एक देश एक निवडणूक यासंदर्भात विचार मंथन सुरू आहे. परंतु वन नेशनमध्ये महाराष्ट्र राज्य आहे. याची जाणीव या सरकारला करून द्यायला हवी. या सरकारमध्ये राज्यातील निवडणुका घेण्याची हिंमत नाही. वन नेशनमध्ये महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका यावेळी आदित्य ठाकरे यांनी मांडली. शिवसेनेने मंत्रीपद दिले अनेक खाती दिली मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना त्याचा फायदा घेत खोके घेऊन शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसून सत्तेवर बसले आहेत. त्यावरून त्यांचे मन किती काळे आहे. हे समोर आले आहे. माथ्यावर बसलेला गद्दारांचा शिक्का सरकार कसा असेल असा प्रश्न विचारत डीप क्लिनिंग मनाचे करण्याची गरज आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

    भरत गोगावलेंच्या हस्ते घरांचं वाटप; तळीये दरड दुर्घटनाग्रस्तांना दोन वर्षांनंतर दिलासा

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गेले होते याबाबत विचारणा केली असता विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जातात हे पहिल्यांदाच ऐकले असून ही आश्चर्यकारक बाब आहे. विधानसभा अध्यक्षांकडे ऐतिहासिक भूमिका घेणे हातात आहे. देशात संविधान आहे याची जाणीव असायला हवी संविधानानुसार विधानसभा अध्यक्ष निकाल देणे अपेक्षित आहे एकीकडे दबावतंत्र असले तरी त्याला न जुमानता विधानसभा अध्यक्षांनी संविधानाप्रमाणे निर्णय दिल्यास ऐतिहासिक निर्णय होईल आणि चाळीस गद्दार बाद होतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed