• Sat. Sep 21st, 2024

दरोड्यासाठी चोरटे दबा धरुन बसलेत; पोलिसांना मॅसेज, पडताळणी केल्यावर समोरील दृष्य पाहून पोलिसही चक्रावले

दरोड्यासाठी चोरटे दबा धरुन बसलेत; पोलिसांना मॅसेज, पडताळणी केल्यावर समोरील दृष्य पाहून पोलिसही चक्रावले

जालना: दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींच्या मौजपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखान्याच्या जवळ असलेल्या हॉटेल लंकाच्या पाठीमागील भागात काही इसम दरोड्याच्या उद्देशाने दबा धरुन बसले असल्याची माहिती मौजपुरी पोलिसांना गुप्त महितीदाराकडून मिळाली होती. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले असता तिथे अज्ञात ५ लोक एका मोठ्या वाहनाच्या मागे दबा धरुन बसलेले दिसले.
उसाला पाणी द्यायचे सांगून शेतात नेलं; अचानक पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकलं, पतीच्या धक्कादायक कृत्यानं गाव हादरलं
पोलिसांनी चपळाईने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांसोबत झटापट केली. परंतु तयारीत आलेल्या पोलिसांनी त्यातील दोघांना पकडले. मात्र या झटापटीत तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. दयालसिंग गुलजारसिंग टाक आणि नरसिंग अथरसिंग बावरी असे ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांची नावे असून पळून गेलेल्या तिघांपैकी एकाचे नाव आकाशसिंग नरसिंग बावरी असे समोर आले आहे. यावेळी पोलिसांनी पकडलेल्या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले. आज सकाळीच रामनगर भागात स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे ए.टी.एम मशीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते.

रेसकोर्सचा प्रश्न, रखडलेली उद्धाटन; शिवसैनिकांसमोर आदित्य ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं

त्याचा तपास पोलीस करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी या दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याजवळील अशोक लेलॅण्ड पिकअप वाहनाची झडती घेतली असता पोलिसही चक्रावून गेले. त्या गाडीत स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे ए.टी.एम मशीन अर्थवट तुटलेली तसेच इतर साधन साहित्य असा एकूण ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. या कारवाईत पकडलेल्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासली असता त्यांच्यावर जालना जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात देखील विविध कलमान्वये २२ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून तीन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed