• Mon. Nov 25th, 2024
    भरधाव ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर धडक; ट्रकचा चालक गंभीर, प्रवासी किरकोळ जखमी

    हिंगोली: औंढा नागनाथ ते जिंतूर रोडवरील गोरेगाव, साळना गावाजवळ एसटी आणि हायवा टिप्पर यांच्या समोरासमोर अपघात झाला आहे. यामध्ये टिप्परचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून एसटी मधील सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. एसटी बस जिंतूर आगारातील असून एसटी बस ही औंढा नागनाथ येथून जिंतूरकडे जात होती. तर जिंतूर येथे वाळू टाकून हायवा टिप्पर जिंतूरकडून औंढ्याच्या दिशेने येत होता. यात भरधाव टिप्परने एसटीला धडक दिली, अशी माहिती आहे.
    वायफायचे नेटवर्क मिळत नाही; कर्मचाऱ्याला घरी बोलवले, आधी वाद घातला, नंतर मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून मारहाण
    या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस निरीक्षक जि. एस राहिरे, जमादार संदीप टाक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून इतर वाहनांना वाट काढून दिली आहे. ही घटना ही पावणे आठच्या दरम्यान घडली आहे. हायवा टिप्पर आणि एसटी या दोन्ही वाहनांचे या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हायवा टिप्परचा ड्रायव्हर जखमी झाला.

    आमचा बाप कांद्यात मेला की, मोदींच्या रथ यात्रेला विरोध, बार्शीच्या सुशिक्षित तरूणांचा संताप

    ड्रायव्हरचे नाव सुधाकर दामोदर घुगे (४४ रा. अंजनवाडी) यास ताबडतोब रुग्णवाहिकेमधून औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार डॉक्टर सतीश वाकळे करीत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed