• Sat. Sep 21st, 2024

वायफायचे नेटवर्क मिळत नाही; कर्मचाऱ्याला घरी बोलवले, आधी वाद घातला, नंतर मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून मारहाण

वायफायचे नेटवर्क मिळत नाही; कर्मचाऱ्याला घरी बोलवले, आधी वाद घातला, नंतर मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून मारहाण

नवी मुंबई: राज्य सरकामधील उच्च पदस्थ अधिकारी अमन मित्तल यांच्यावर मारहाण प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्तल आणि त्यांच्या भावाने चार साथीदारांच्या सहकार्याने लाकडी बांबू, पियूसी पाईपने एअरटेल कर्मचारी सागर मांढरे आणि भुषण गुजर यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि राज्याचे सचिव यांना भेटून लेखी तक्रार करणार असल्याचे एअरटेल कर्मचारी यांनी स्पष्ट केले आहे.

अमन मित्तल यांनीच मारहाण करून आमच्यावर पोलिसात तक्रार केल्याचेही भुषण आणि सागर यांनी सांगितले. नवी मुंबईतील एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना आयएएस अधिकाऱ्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आयएएस अमन मित्तल यांनी मारहाण केल्याचा आरोप एअरटेलच्या दोन कर्मचाऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी अमन मित्तल आणि मारहाण झालेले कर्मचारी यांनी दोघांविरोधात तक्रार दिली आहे. मारहाण झालेल्या तरुणांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत मांडलं आहे. त्यामुळे याप्रकरणाची आता सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर, १७ व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव
सध्या नवी मुंबईमधील पोलीस आयएएस अधिकाऱ्याच्या दबावाखाली असल्यामुळे त्यांनी मारहाण केलेल्या तरुणांची बाजू ऐकून घेतली नाही. तक्रार दाखल करायला आठ दिवस लावले आहेत. हीच नवी मुंबई पोलिसांची खरी कामगिरी आहे का? असा संताप नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत. सागर मांढरे हे नवी मुंबई कोपरखैरणे मध्ये राहत असून ते एअरटेल कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. मांढरे हे ‘Wifi Router Installation’ साठी घणसोली मध्ये व्यंकटेशश्वर बिल्डिंग मध्ये गेले होते. त्याच ठिकाणी एका कस्टमरची इंटरनेट बद्दल तक्रार आली ती पाहण्यासाठी मांढरे तिथे गेले होते.

तो ग्राहक हा आयएएस अधिकारी होता. त्याच्यासोबत त्याचा घरामध्ये त्याचा भाऊ देखील होता. इंटरनेटची तपासणी केली असता इंटरनेट सुरळीत चालू असल्याची खात्री झाली. परंतु आयएएस अधिकारीला बेडरूममध्ये रेंज मिळत नसल्याचे त्याने मांढरेला सांगितले. मांढरेने त्याची देखील पाहणी केली. बेडरूममध्ये त्याला रेंज मिळत नव्हती. त्यावर मांढरे यांनी त्याला सांगितले तुमचे 4BHK घर आहे. हॉलमध्ये राऊटर लावल्याने त्याची रेंज बेडरूम पर्यंत मिळण शक्य नाही. त्यावर आयएएस अधिकारी मांढरे यांच्यावर भडकला. “मी एवढे पैसे भरले आहेत मला बेडरूममध्ये रेंज आलीच पाहिजे” असं तो बोलू लागला.

रेसकोर्सचा प्रश्न, रखडलेली उद्धाटन; शिवसैनिकांसमोर आदित्य ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं

त्यावर मांढरे यांनी मित्तल यांना wifi solution बद्दल सांगितले. परंतु त्यावर तो अजून भडकला. मांढरे यांना शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. मात्र मांढरे यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्तल यांनी काही ऐकलं नाही. मांढरे यांच्या अंगावर धावून येऊ लागले. मांढरे यांनी मित्तल यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर त्या IAS अधिकारी (अमन मित्तल) आणि त्याचा भाऊ (देवेश, मित्तल) यांनी घराचा दरवाजा बंद करून मांढरे याला मारहाण करण्यास सुरुवात केली. खाली तैनात असणाऱ्या शिपाई कामगारांना यांना देखील कॉल करून बोलावून घेतले. ते ४ जण लोखंडी पाईप, PVC पाईप आणि लाकडी दंडुके घेऊन वर आले. काहीही विचार न करता त्या ४ जणांनी देखील मांढरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यानेच पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. मांढरे यांना पोलीस तेथून घेऊन जात असताना त्यातील एकाने पुन्हा दोन वेळा मांढरे यांच्या कानशिलात लगावली. रबाळे पोलीस स्टेशनला घेऊन त्या अमन मित्तलच्याच गाडीतून घेऊन गेले. मांढरे यांच्या अंगावरील घाव बघितल्यावर पोलीस ऐरोली येथे NMMC हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. नंतर पोलीस स्टेशनला आल्यावर प्रथम मांढरे यांच्यावर FIR दाखल केली. मात्र मांढरे यांची तक्रार पोलीस घेत नव्हते. यावेळी अनेक सहकारी आणि मित्र रबाळे पोलीस चौकीबाहेर उभे होते. अनेक जणांना संपर्क केल्यावर सकाळी ३ वाजता त्यांनी मांढरे यांची तक्रार नोंदवली.

पोलिसावर सुध्दा मित्तल यांनी वरून दबाव आणल्याचे मांढरे यांना जाणवले. या घटनेला आठवडा झाला तरी देखील गुन्हेगारांवर अजून कोणतीही कारवाई झाली नाही. आरोपी अमन मित्तल IAS आणि त्याचा भाऊ देवेश मित्तल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी पोस्ट देखील मांढरे यांनी फेसबुकवर केली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतर या घटनेबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed