• Sat. Sep 21st, 2024

आईला म्हणाली घरी उशिरा येईन, मात्र लेक पुन्हा परतलीच नाही, वाटेतच सारं हरवलं…

आईला म्हणाली घरी उशिरा येईन, मात्र लेक पुन्हा परतलीच नाही, वाटेतच सारं हरवलं…

नवी मुंबई: शहरामध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये रस्त्यांवर अपघात होण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या अपघातांमध्ये अनेकवेळा काही व्यक्तींना जीव देखील गमवावे लागतात. नवी मुंबई पनवेलच्या बाजूला असलेल्या दरवाजा परिसरामध्ये बाईक वरून जाणाऱ्या तरुणीचा पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक वेळा भरधाव वेगाने गाड्या चालवतात आणि अपघाताला आमंत्रण देतात. मात्र, यामध्ये नाहक प्रवाशांचे जीव गमावलेले पाहायला मिळतात. तळोजा परिसरामध्ये २३ वर्षे असलेल्या तरुणीचा गाडीवरून पडून मृत्यू झाल्याने आजूबाजूच्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही तरुणी मित्रासोबत मोटारसायकलवरुन घरी जात असताना रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाली. त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना तळोजा-कल्याण रोडवर घडली. या घटनेतील मृत तरुणीच्या मित्राने भरधाव वेगात मोटारसायकल चालवून नेल्याने मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली तरुणी खाली पडून तिचा मृत्यू झाल्याचं आढळून आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी या अपघाताला जबाबदार धरुन मृत तरुणीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Sharad Mohol: ९ वर्ष तुरुंगात, अनेक प्रकरणांमध्ये नाव, ड्रायव्हर ते कुख्यात गँगस्टर कसा बनला शरद मोहोळ?
या अपघातात मृत झालेल्या तरुणीचे नाव शैफिता मुस्ताक खान (२३) असे असून ती कल्याण पलावा येथील मारवेला सोसायटीत आई वडील आणि भावंडासह राहत होती. शैफिता ही चेंबुर येथील आयटी कंपनीत काम करत होती. सकाळी ७ वाजता ती कामावर जाऊन रात्री १० वाजता घरी परतत होती. सकाळी शैफिता नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेली होती. त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास शैफिताने आपल्या आईला फोन करुन कामावरुन घरी येण्यास तिला उशीर होणार असल्याचे आईला सांगितले होते. त्यानंतर रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास शैफिता ही आपला मित्र सुफियान सलीम कुरेशी (२८) याच्यासोबत त्याच्या मोटारसायकलवरून आपल्या घरी परतत होती.

यावेळी त्यांची मोटारसायकल तळोजा एमआयडीसीतील नावडे फाटा कल्याण रोडवरील महानगर गॅस पंपाजवळ आली असताना, शैफिताचा तोल गेल्याने ती मोटारसायकलवरुन खाली पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत होऊन ती गंभीर जखमी झाल्याने सुफियान याने तीला कामोठे येथील एमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या अपघातानंतर तळोजा पोलिसांनी या अपघाताला मृत शैफिताचा मित्र सुफियान कुरेशी याला जबाबदार धरुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

२६ वर्षीय तरुणाला हवेत हार्ट अटॅक; पुण्याहून लखनऊला जाणारं विमान नागपुरात एमर्जन्सी लँड अन्…
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed