• Sat. Sep 21st, 2024
बराच वेळ लेक परतली नाही; कुटुंबाचा जीव कासावीस, पोलिसात धाव, मात्र नको तेच घडलं अन्…

रत्नागिरी: चिपळूण येथील शहरात ओझरवाडी येथे राहणाऱ्या दिशा मिलिंद माने या युवतीचा मृतदेह दापोली तालुक्यात पाळंदे समुद्रकिनारी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. घरी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली मुलगी संध्याकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी चिपळूण शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
चिमुकलीचे अपहरण; पोलिसांचे शोधकार्य, तपासाचे धागेदोरे भिकारी महिलेपर्यंत पोहोचले, चौकशीत धक्कादायक सत्य समोर
शनिवारी सकाळी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पाळंदे समुद्रकिनारी अज्ञात युवतीचा मृतदेह आढळला होता. येथील स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह मिळाल्याची माहिती तात्काळ दापोली पोलिसांना दिली. दापोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले होत. या दरम्यान चिपळूण येथे एक युवती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या तक्रारीवरून संबंधित नातेवाईकांना दापोली येथे पाचारण करण्यात आले. त्यानंतर मिळालेला हा मृतदेह त्या बेपत्ता युवतीचा असल्याचे निश्चित झाले.

टक्केवारीचं शेण कुणी खाल्लं? शिंदे गटातील मंत्री-खासदारांमध्ये शिवीगाळ, बैठकीतच भिडले!

मिळालेल्या माहितीनुसार, दिशा ही इयत्ता बारावीमध्ये शिकणारी ही मुलगी चिपळूण येथील डीबीजे कॉलेजची विद्यार्थिनी होती. तिच्या पश्चात्त्य आईवडील, दोन बहिणी असा परिवार आहे. या युवतीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. मिळालेला मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. माने कुटुंबीयांचे गाव दापोली तालुक्यातील वाकवली येथील आहे. मुलांच्या शिक्षणासाठी हे कुटुंब चिपळूण येथे वास्तव्यास आहे. दिशा माने हिच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पंचनामा दापोली पोलिसांनी केला असून अधिक तपास दापोली तालुक्यातील हर्णै पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डि.डि.पवार अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed