• Sat. Sep 21st, 2024
सतेज पाटील भाजपमध्ये दाखल होतील, शिवसेनेच्या माजी आमदाराचा दावा,कोल्हापूरमध्ये काय घडणार?

कोल्हापूर: सतेज पाटील हे शिवसेनेचे बोट धरून विधानसभेत गेले आणि नंतर शिवसेनेला विसरून काँग्रेसला जवळ केले. आता शिवसेनेचे सात खासदार भाजपकडून निवडणूक लढवणार असं ते वक्तव्य करत आहेत सतेज पाटील काय ज्योतिषी आहेत का आम्ही एक संघ आणि भक्कम आहोत, असं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे १८ च्या वर खासदार आम्ही निवडून आणू उलट सतेज पाटील यांचे सर्व दोन नंबरचे व्यवसाय आहेत. आणि मोदी सरकारच्या काळात त्यांना काही करता येणार नाही यामुळे आपल्यालाही काँग्रेस बदल कढ करावी लागेल आणि भाजपमध्ये जायचं आहे या हेतूने ते असे वक्तव्य करत असून पुढील काही दिवसात सतेज पाटील भाजपमध्ये दाखल झालेले दिसतील असा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला आहे.ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
रस्त्यात अचानक काही आडवं आलं अन् कारचं नियंत्रण सुटलं; एका क्षणात हसतंखेळतं कुटुंब उद्धवस्त

सतेज पाटील यांची पळता भुई थोडी झालीय

शिवसेना शिंदे गटाचे दहापैकी सात खासदार हे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे लेखी पत्र दिले असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. दरम्यान या वक्तव्याला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून पळून जाणाऱ्या भेकडांच्या गर्दीत गेलो नाही : अमोल कोल्हे
सतेज पाटील हे ज्योतिषी आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.तसेच सतेज पाटील हे आदेश शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेत गेले आणि शिवसेनेला सोडून काँग्रेसला जवळ केले. आता सतेज पाटील यांची पळता भुई थोडी झाली आहे. त्यांचे व्यवसाय सर्व दोन नंबर आहेत. आणि मोदी सरकार असल्याने आता त्यांना काही करता येत नाही. यामुळे आपल्यालाही काँग्रेस मधून कड काढायची आहे आणि भाजपमध्ये जायचं आहे या हेतूने ते असे वक्तव्य करत आहेत. पुढच्या काही दिवसात सतेज पाटील भाजपमध्ये दाखल झालेले दिसून येतील असा दावा क्षीरसागर यांनी केला आहे.
जगनमोहन रेड्डींच्या बहिणीची पंजाला साथ, म्हणाल्या, वडिलांना राहुल गांधींना PM म्हणून पाहायचं होतं!
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed