• Sun. Sep 22nd, 2024

भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान कंपनीला आयकर विभागाची नोटीस

भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान कंपनीला आयकर विभागाची नोटीस

वाशिम: खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या कंपनीला आयकर विभागाने नोटीस दिली आहे. ५ जानेवारीपर्यंत त्यांना आपलं म्हणणं मांडावं लागेल. भावना गवळी यांनी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये १२ मे २०२० रोजी रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये १८ कोटी १८ लाख ४० लाख ८६७ रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. तसेच याच दिवशी त्यांनी दुसरी एक तक्रार ७ कोटी रुपये रोख चोरी झाल्याची दिली होती.
मेट्रोच्या विस्तारीकरणाला हिरवा कंदील; प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत निर्णय, अजित पवारांनी आढावा घेतला
या संदर्भातील आयकर भरला नसल्याने त्याचे विवरण सादर करण्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे. शिवाय महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे कंपनीत रूपांतर करतांना संस्थेची १०० कोटी रुपयांची मालमत्ता अवैधरित्या वळती करण्यात आली होती. त्या व्यवहाराची माहिती देण्याचही नोटीसमध्ये सांगण्यात आले. याचा संस्थेच्या व्यवहारासंदर्भात ईडीने सुद्धा भावना गवळी यांच्यावर कारवाई केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील धर्मादाय आयुक्त यांनी या संदर्भात स्वतः हून दखल घेत प्रकरण दाखल दाखल करून घेतले. त्यामुळे भावना गवळींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांना पगार नाही, राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला माजी सभापतींनी ठोकले टाळे

१८ कोटी आणि सात कोटी रुपये गहाळ झाल्याची तक्रार केली होती. अशा एकूण २४ कोटी रुपये संदर्भात जी त्यांनी तक्रार केली होती त्याचा इन्कम टॅक्स भरला नसल्याचे निदर्शनास आल्याने ही नोटीस देण्यात आलेली आहे. या सोबतच महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे त्यांनी कंपनीमध्ये रूपांतर केले. त्यावेळेस शंभर कोटी रुपयांची प्रॉपर्टी अनधिकृतरित्या हे ट्रान्सफर करण्यात आली होती. त्या संदर्भात खुलासा हा या नोटीसद्वारे मागवण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed