• Mon. Nov 25th, 2024

    मुलीचे कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल, सख्खा मावस भावाचं नको ते कृत्य, पोलिसांनी ‘असा’ पकडला

    मुलीचे कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल, सख्खा मावस भावाचं नको ते कृत्य, पोलिसांनी ‘असा’ पकडला

    बारामती : बारामती तालुक्यातील एका गावात शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यूट्यूबवरती व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी अखेर या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा आरोपी पीडितेचा सख्खा मावस भाऊ आहे. पीडित विद्यार्थीनी बारामती शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यूट्यूब ला व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात होते.

    याबाबत त्या मुलीच्या मैत्रिणींनी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला. त्यानंतर बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना सर्व हकीकत सांगितली. मुलीला मेसेज येत असलेल्या मोबाइलचे डिटेल्स काढण्याचा प्रयत्न सुरूवातीला करण्यात आला. परंतू त्याने मोबाईल स्वीच ऑफ ठेवला. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅप लावण्याचे नियोजन केले. पण आरोपी सकाळी सात पासून मुलीला ब्लॅकमेल करून भेटायला बोलवत होता.

    त्यानंतर घाबरलेल्या मुलीसोबतच्या मैत्रिणीनी, व सामाजिक कार्यकर्त्यांने प्लॅन केला. त्या आरोपीला मुलगी घाबरली आहे, ती भेटायला तयार असल्याचे भासवले. त्यावर आरोपीने तिला शाहू हायस्कुल समोर भेटायला बोलावले. तसेच परत पुढे पाटस रस्ता येथे आरोपीने येण्यास सांगितले.

    यावेळी शहर पोलीसचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना मदत मागण्यात आली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटाच्या आत गुन्हे शोध पथकाचे अक्षय सीताप ,दशरथ इंगुले हे कर्मचारी हजर झाले. सर्वांनी मिळून आरोपीपर्यंत पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल जप्त केला. आरोपी हा मुलीचा सख्खा मावस भाऊ निघाला.

    दरम्यान, मुलीचे आईवडील गरीब असल्याचा फायदा घेत तिने तक्रार करू नये म्हणून दबाव आणण्यात आला. त्यानंतर याबाबत पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed