• Sat. Sep 21st, 2024

हातात अंगठी का घातलीय? माजी सैनिकाला सवाल, क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याची बतावणी अन् लाखोंचा गंडा

हातात अंगठी का घातलीय? माजी सैनिकाला सवाल, क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याची बतावणी अन् लाखोंचा गंडा

दौंड: क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून चक्क माजी सैनिकाचे दागिने हात चलाखीने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडला आहे. दौंड शहरातील शालिमार चौकात माजी सैनिकाचे तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने हात चलाखीने लुटून नेल्याचे समोर आले आहे. सदर घटना भरदिवसा व वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी के.जे.चंद्रन ( वय ७० रा, कोईमतुर तामिळनाडू सध्या रा.जनता कॉलनी हिंदुस्तान चर्च दौंड ) यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, के.जे.चंद्रन हे दुपारी दीडच्या सुमारास दौंड येथील शालिमार चौकात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. दरम्यान तिथे ४० ते ४५ वयाचा १ इसम फिर्यादींला भेटून म्हणाला की, मी क्राईम ब्रँच अधिकारी आहे. तुम्ही रेल्वेत नोकरीला होता ना? असा सवाल इसमाने केला त्यावर फिर्यादी हो म्हणाले. यानंतर त्या इसमाकडून एक्सचेंज ऑफिसर मनोज शर्मा तुम्हाला माहित आहेत का? मी चौकशी करीत आहे. अशी विचारणा केली. तुम्ही येथून हलू नका. गोंधळ करू नका असे बजावले त्यामुळे फिर्यादी शांतपणे थांबले.

अकोल्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला, अंदाधुंद गोळीबाराने खळबळ

दरम्यान त्याने आणखी एका व्यक्तीला आवाज देऊन बोलवले. ती व्यक्ती त्या ठिकाणी आली असता तो म्हणाला की, मी क्राईम ब्रँच अधिकारी आहे. तुझे पॉकेट दाखव. हातात अंगठी का घातली आहे. ती काढून तुझ्या रुमालात ठेव. आणि तू रुमाल तुझ्याच खिशात ठेव. त्यानंतर त्याने फिर्यादीला रुमाल काढण्यास सांगितले. मात्र फिर्यादी यांच्याकडे रुमाल नव्हता. त्यामुळे चोरट्याने स्वतःचा रुमाल त्यांना दिला व म्हणाला की, तुमच्या दोन्ही सोन्याच्या अंगठ्या व चैन काढून रुमालात ठेवा. त्यामुळे फिर्यादी यांनी आपल्या कडील सोन्याच्या दोन अंगठ्या व चेन रूमलात ठेवून ती आपल्या खिशात ठेवली. नंतर ते दोघेही तेथून गडबडीने निघून गेले. फिर्यादींनी आपल्या खिशातील रुमाल उघडून पाहिला असता त्यांनी ठेवलेले सोन्याचे दागिने नसल्याचे त्यांना समजले. त्यावेळी फिर्यादी यांच्या लक्षात आले की, त्या दोन अज्ञात इसमांनी हातचलाखी करून त्यांचे साडेचार तोळ्यांचे २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहेत..

चोराने नवं अलिशान घर बांधलं, पण टीव्ही नसल्याने थेट चोरी; पोलिसांकडून अटक होताच स्वप्न अपूर्ण!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed