• Sat. Sep 21st, 2024
चोरट्यांचा धाडसी दरोडा! धावत्या मिनीबसमध्ये चढून प्रवाशांना लुटलं; सोन्यासह पैशांवर मारला डल्ला

धाराशिव: गेवराई तालुक्यातील वडगाव येथील आवटे सच्चिदानंद हे त्यांच्या मिनी बसमध्ये प्रवासी भरुन अक्कलकोटवरून बीडकडे जात होते. त्यावेळी १३ डिसेंबर रोजी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास तेरखेडा येथील आरुष बिअरबार ते तेरखेडा पासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने मिनी बसच्या टपावर चढून ८ प्रवासी बॅगेमधील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ५०,००० रू तसेच कपडे असा एकूण अंदाजे ८९,००० रुपये किंमतीचा माल चोरल्याची घटना घडली आहे.
घरच्यांचा प्रेमाला विरोध; प्रेयसीचाही बोलण्यास नकार, रागात तरुण नको ते करुन बसला, कुटुंब हळहळलं
सच्चिदानंद आवटे यांनी ३० डिसेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, येरमाळा पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान चालत्या वाहनावर चढून चोरी करण्याचा प्रकार हा काही नवीन नाही. ह्या आधी देखील तेरखेडा ते पार्डी फाटा ह्या ठिकाणी अनेक प्रवाशांच्या बॅगेतील ऐवज तसेच वाहनातील कपडे, किराणा तसेच इतर माल चोरीच्या घटना सातत्याने होत आहेत.

कोकणातला प्रकल्प गुजरातला गेला, पण राणे, सामंत, केसरकर शिवसेनेवर टीका करण्यात गुंग

कधी-कधी तर प्रवाशांना किंवा वाहनधारकांना चोरी झाल्यास फिर्याद नोंदवण्यासाठी येरमाळा किंवा वाशी पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे मारावे लागत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. हायवेवरील चोरींच्या घटना रोखण्यासाठी आणि चोऱ्यांचा तपास लावण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed