• Sat. Sep 21st, 2024
सरत्या वर्षाला निरोप,नव्या वर्षाचं स्वागत, पर्यटक महाबळेश्वर पाचगणीत दाखल, बाजारपेठा सजल्या

सातारा : नववर्षांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं गिरिस्थळ महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे. या ठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नववर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणार महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे.

पॅराग्लायडिंग, हॉर्स रायडिंग, घोडागाडी तसेच नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात जत्रेचं स्वरूप आलेले पाहायला मिळत आहे. याबरोबर खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत धमाल मस्ती केली जात आहे. विविध पॉईंट्स, टेबल लँडवर ही गर्दी आहे. ऐन थंडीतही आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी ज्यूस, क्रीम, आईस गोळ्यांच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत.
अकोल्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला, अंदाधुंद गोळीबाराने खळबळ
नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्समध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. गिरिस्थानांवर वाढलेली पर्यटकांच्या गजबजीमुळे शहरांच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. महाबळेश्वर, पाचगणी परिसरात पर्यटकांची गर्दी वाढल्याने वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत होत आहे. पसरणी घाट ते महाबळेश्वरपर्यंत जागोजाग वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केले आहेत.
चिनी लष्करात खळबळ; अण्वस्त्रांची देखभाल करणाऱ्या रॉकेट फोर्सचे ३ टॉप कमांडर बडतर्फ
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी झाली आहे. महाबळेश्वरच्या वनविभागाच्या हद्दीत वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये याकडे या विभागाने कटाक्षाने लक्ष दिले आहे. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना, फटाके फोडण्यास, धूम्रपान करण्यास, मादक पदार्थाचे सेवन करण्यास, मद्य पिऊन गाडी चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; दारु, अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed