• Sat. Sep 21st, 2024
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरु, छत्रपती संभाजीनगरची लेक बनली सहाय्यक लोको पायलट

छत्रपती संभाजीनगर: जालना येथून मुंबईसाठी धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची सहायक लोको पायलट होण्याचा मान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या लेकीने मिळवला आहे. फुलंब्री तालुक्यातील पाल या गावातील २७ वर्षीय कल्पनाची सहायक लोको पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जालन्याहून मुंबईसाठी निघालेल्या या वंदे भारत एक्सप्रेस ची पहिली सहाय्यक लोको पायलट होण्याचा मान छत्रपती संभाजी नगरच्या लेकीला मिळाला आहे.

जालना मुंबई साठी ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसची सहायक लोको पायलट होण्याचा मान छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री तालुक्यात असलेल्या पाल येथील कल्पना मदनसिंग धनावत हिला मिळाला आहे. मुळची पाल येथील असलेली कल्पना हिचे वडील मदनसिंग हे छत्रपती संभाजी नगर शहरातील एसटी महामंडळ मध्ये नोकरीला होते. ते आता निवृत्त झाले आहे. मदनसिंग हे कुटुंबीयांसोबत छत्रपती संभाजी नगरच्या मयूर पार्क भागामध्ये राहतात. कल्पनाने छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक पॉवर इंजीनियरिंग या विषयात २०१६ मध्ये पदवी मिळवली आहे. त्यानंतर कल्पनाहीची २०१९ मध्ये रेल्वे विभागात परीक्षेद्वारे लोको पायलट पदावर निवड झाली. प्रशिक्षण घेऊन कल्पना आता लोको पायलट म्हणून काम करीत आहे.
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर गाठणं आता सोप्पं, कळसूबाईवर जाण्यासाठी आता रोप वेची सुविधा
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनासाठी जय्यत तयारी केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची सहायक लोको पायलट म्हणून छत्रपती संभाजी नगरची लेक असलेली कल्पना धनावत ही असणार आहे. यामुळे छत्रपती संभाजी नगरकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
संजय राऊतांनी मविआच्या जागा वाटपाचं सूत्र सांगितलं, राज्यात लोकसभेला किती जागा जिंकणार थेट आकडा सांगितला…
याबद्दल कल्पनाचे वडील म्हणाले की कल्पना ही लहानपणापासूनच अत्यंत हुशार होती. तिने शालेय जीवन असो किंवा महाविद्यालय असो यामध्ये चांगली कामगिरी केली. जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर तिने रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण केली. आज ती मराठवाड्याच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस साठी सहायक लोको पायलट म्हणून काम करणार आहे. याबद्दल ती माझी लेक असल्याचा मला अभिमान वाटतो असं तिचे वडील मदनसिंग धनावत अभिमानाने सांगतात.
पुण्याची बस ताम्हिणी घाटात उलटली, भीषण अपघातात ५५ जण जखमी, दोघांचा मृत्यू

मुलाच्या लग्नात सामाजिक भान जपलं, दिव्यांगाच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed