मुंबई, दि. 29 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त हद्दीत 31 जानेवारी 2024 पर्यंत पेट्रोलियम क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडविणे किंवा फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्र, बॉटलिंग प्लांट, बफर झोन, माहुल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. असे बीडीयू प्लांट क्षेत्र, स्पेशल ऑइल रिफायनरीच्या 15 आणि 50 एकर क्षेत्रामध्ये ही बंदी लागू राहणार आहे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.
००००
नीलेश तायडे/विसंअ