• Sat. Sep 21st, 2024
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ही घरची शेती आहे का? – बबनराव तायवाडे

जालना: अंतरवाली सराटी पासून अगदी जवळ असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे साखळी आंदोलन सुरू आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी येथील उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांना साखळी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी सेल अध्यक्ष, बबनराव तायवाडे यांचे देखील उपोषणस्थळी आगमन झाले.
राजे तुमच्यासाठी कायपण! ८२ वर्षांच्या आजीने सर केला शिवनेरी किल्ला, मुलाने केली इच्छा पूर्ण
जालन्यातील वाडीगोद्री येथील आंतरवाली फाटा येथे ओबीसी समाज बांधव मागील २४ दिवसांपासून साखळी उपोषण करीत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, शिंदे समितीला तात्काळ बरखास्त करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे साखळी उपोषण करण्यात येत आहे. हे उपोषण मागे घेण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी सेलचे अध्यक्ष बबनराव तायवाडे हे अंतरवाली फाटा येथे दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत हे साखळी उपोषण मागे घेण्यात आले आहे. यावेळी ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांना आपले साखळी उपोषण मागे घेण्याची मागणी केली होती.

दिवसाला ७० हजार तर महिन्याला २१ लाखांचा तोटा, छ. संभाजीनगरातील जवळपास ८० टक्के गाव संकटात

यावेळी उपोषणस्थळी आलेल्या बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांनी मुंबईत ३ कोटी मराठे येतील या केलेल्या विधानाचा समाचार घेतला असून मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या ३ कोटी तरी आहे का? असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. त्याच बरोबर सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर मराठा समाजापेक्षाही मोठ आंदोलन करू. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ही घरची शेती आहे का? सरकारने आम्हाला दिलेल्या शब्दांत फेरफार केली तर रस्त्यावर उतरू असा गर्भित इशारा दिला आहे. ते वडीगोद्री इथे बोलत होते. तसेच जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार आता कमी झाली आहे, असा टोलाही तायवाडे यांनी यावेळी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed