• Sun. Sep 22nd, 2024

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची मुलाखत

ByMH LIVE NEWS

Dec 25, 2023
‘दिलखुलास’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची मुलाखत

मुंबई, दि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात   बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

सन २०२२-२३ करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था (एनआयईपीए), नवी दिल्ली या उच्चतम संस्थेद्वारा शैक्षणिक प्रशासनात उल्लेखनीय योगदानासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी, राजेश कंकाळ यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे व सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्न, त्याचबरोबर मोफत शिक्षणाची समान संधी आणि भौतिक सुविधांची उपलब्धता करून देणे  तसेच महानगरपालिका शाळांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या शाळांमधील पटसंख्येत वाढ व्हावी यासाठी ‘मिशन अॅडमिशन, एकच लक्ष्य – एक लक्ष ’ ही विशेष मोहीम,  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि योजनांबाबत शिक्षणाधिकारी श्री. कांकळ यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून श्री कंकाळ यांची मुलाखत मंगळवार दि. 26 आणि बुधवार दि. 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed