डीसीपी अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली झोन ११ मधील वरिष्ठ अधिकारी निनाद सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती भोपळे आणि बोरिवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि ज्या खोलीला दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती देण्यात आली होती, त्या खोलीला वेढा घातला.
दरवाजा ठोठावल्यानंतर पोलिस अधिकारी तातडीने घरात दाखल झाले. कसून शोध घेतल्यानंतर तिथे राहात असलेले मदन प्रजापती आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. ते दोन महिन्यांपासून भाडेकरू असून शेजारीच गिफ्ट शॉप चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
“या घराचा मालक पप्पुराम सुतार (पाली, राजस्थानचा रहिवासी) त्याने प्रजापती आणि त्याच्या नातेवाईकांना खोली भाड्याने दिली होती. घराच्या झडतीदरम्यान काहीही संशयास्पद आढळून आले नाही”, अशी माहिती बोरिवली पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिली.
एअर इंडियाचे ऑपरेशन मॅनेजर पालकर यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिल्याचं तपासात आढळून आलं. घर क्रमांक १८ मध्ये राहणाऱ्या पालकर यांना मालक सुतार यांच्याकडून १७ क्रमांकाचे घर खरेदी करायचे होते. जेव्हा सुतार यांनी घर विकण्यास नकार दिला तेव्हा पालकर यांनी सुतार यांना मालमत्ता विकण्यासाठी मजबूर करण्यासाठी दहशतवाद्यांच्या उपस्थितीची खोटी माहिती दिली.
“आम्ही गुन्हा दाखल केला असून पालकरला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली अटक केली आहे. त्याला हॉलिडे कोर्टासमोर हजर करण्यात आले आणि त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News