जळगाव: जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकावरून भरधाव वेगाने निघालेल्या नाशिक-चोपडा बस खड्ड्यामुळे चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तापी सूतगिरणीच्या गेटमधून टाकीला जाऊन आदळली. सुदैवाने झालेल्या अपघातात बसमधील जवळपास साठ प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, याबाबत वरिष्ठ पातळीवरून लागलीच दखल घेऊन चालकास तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याची माहिती चोपडा आगार व्यवस्थापकांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, की सकाळी ११ वाजेच्या सुमारास ६१ प्रवासी घेऊन चोपडा आगारातून चोपडा-नाशिक (एमएच १४ बीटी २१४२ ) या क्रमांकाची बस घेऊन चालक विनोद कोळी (३५) हा चोपड्याहून वेगाने निघाला. वेले गावाबाहेर धरणगाव रस्त्यावरील तापी सहकारी सूतगिरणीजवळ मोठा खड्डा आल्याने गाडीतून चालक बसमधून थेट बाहेर फेकला गेला की चालकाने उडी घेतली अशा संभ्रमावस्थेतील प्रकार घडून विना चालकाची गाडी सूतगिरणीच्या गेटमधून एन्ट्री करीत टाकीजवळ आदळली. या प्रकाराने प्रवासी मात्र भांबावून गेल्याने गोंधळ उडाला.

दरम्यान, चालक गाडीच्या मागे धावत असल्याचे सूतगिरणी जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने घटनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता विनोद कोळी या चालकास वरिष्ठ कार्यालयातून निलंबित करण्याची करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.