• Sat. Sep 21st, 2024

घरखर्चाच्या पैशावरुन वाद, पत्नीने बोचकारले पतीचे नाक, नंतर रागाच्या भरात भयंकर कृत्य, काय घडलं?

घरखर्चाच्या पैशावरुन वाद, पत्नीने बोचकारले पतीचे नाक, नंतर रागाच्या भरात भयंकर कृत्य, काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : घरखर्चाला पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीने मारहाण करून पतीचा खून केला. ही घटना १८ डिसेंबर रोजी मध्यरात्री भारतमाता नगर, दिघी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

काय घडलं?

रवींद्र बाबूलाल नागरे (वय ३९, रा. भारतमातानगर, दिघी; मूळ रा. चाळीसगाव, जि. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रवींद्र यांच्या बहिणीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रवींद्र यांच्या पत्नीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र नागरे पेट्रोल पंपावर काम करत होते. तर त्यांची पत्नी गृहिणी होती. दोघे जण भारतमातानगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. १७ डिसेंबर रोजी रवींद्र यांनी पत्नीला घरखर्चासाठी पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रवींद्र कामावर गेले. रात्री घरी आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद होऊन भांडण झाले. त्यानंतर पत्नीने रवींद्र यांना हाताने मारहाण करून चेहऱ्यावर नखाने ओरखडून जोरात सोफ्यावर ढकलून दिले. त्या वेळी रवींद्र यांच्या नाकाला, गळ्याला दुखापत झाली. त्याच वेळी पत्नीने रवींद्र यांचा शर्ट घेऊन तो रवींद्र यांच्या नाकावर दाबून धरत त्यांचा खून केला. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

उभ्या ट्रकला धडकून काँग्रेस आमदाराच्या गाडीला अपघात, एका मजुराचा मृत्यू; व्हिडिओ समोर

स्कूलबसचा चालक
चाकाखाली चिरडला

पिंपरी : गिअर काढताना स्कूलबस अंगावरून गेल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता चाकण येथील गवते वस्ती येथे घडली.
सुनील वामन खिलारी (रा. राजगुरूनगर, ता. खेड) असे मृत चालकाचे नाव असून, त्यांचा मुलगा अक्षय (वय २७) या चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील खिलारी हे स्कूलबसवर चालक म्हणून काम करत होते. गवते वस्ती येथे रिव्हर्स गिअर अडकल्याने बस बंद पडली होती. तो गिअर काढण्यासाठी सुनील बसच्या खाली गेले. त्यांनी बसमधील महिलेला बस सुरू करण्यास सांगितली. त्यात बस मागे गेली आणि बसचे चाक सुनील यांच्या अंगावरून गेली. त्यात गंभीर जखमी होऊन ते मृत्युमुखी पडले. ही बस मागे जाऊन परिसरातील घरांवर आदळली. यात घरांचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed